भारतीय रेल्वेशी संबंधित कंपनी रेल विकास निगम लिमिटेड सतत आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल करत आहे.

आता कंपनीला 1097.68 कोटींची नवी ऑर्डर मिळाली आहे. हिमाचल स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्डाकडून ही ऑफर देण्यात आली आहे.

नवी ऑर्डर मिळाल्याचा परिणाम RVNL Stocks वर झाल्याचं दिसत आहे. हे स्टॉक्स रॉकेटप्रमाणे उंच जात आहेत.

कंपनीच्या शेअर्सकडून दिल्या जाणाऱ्या रिटर्नबद्दल बोलायचं झाल्यास, हे शॉर्ट टर्ममध्ये Multibagger Return देणारा ठरत आहे.

मागील शुक्रवारी RVNL चा शेअर 1.99 टक्क्यांनी वाढून 169.30 रुपयांवर क्लोज झाला होता.

रेल्वे विकास निगम लिमिटेडच्या स्टॉकने मागील पाच वर्षांत 757.22 टक्क्यांचा जोरदार नफा दिला आहे.

फक्त मागील एका वर्षात RVNL स्टॉकची किंमत 133.40 रुपयांनी वाढली आहे. म्हणजेच 372 टक्क्यांचा रिटर्न मिळाला आहे.

तसंच मागील सहा महिन्यात या शेअरमध्ये 124 टक्के आणि महिन्याभरात 10 टक्के रिटर्न मिळाला आहे.

शेअर बाजारात कोणतीही गुंतवणूक करण्याआधी मार्केट एक्स्पर्ट्सचा सल्ला नक्की घ्या.

VIEW ALL

Read Next Story