अत्यंत कठीण असणारी मुनी दीक्षा

सलोनीने अत्यंत कठीण असणारी मुनी दीक्षा घेतली आहे. यामध्ये वाहन, इलेक्ट्रिक उपकरणं यांचा वापर निषिद्ध आहे. तसंच सर्व नात्यांचाही त्याग करावा लागतो.

सलोनी MBA उत्तीर्ण

सलोनीने एमबीए केल्यानंतर नोकरी केली आणि नंतर वडिलांचा व्यवसाय सांभाळला होता.

सर्व मोहाचा त्याग

सलोनी आधी सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह होती, पण आता तिने सर्व मोह त्याग केला आहे.

कुटुंबाकडून निर्णयाचं स्वागत

सलोनीच्या वडिलांचं सोन्याचं दुकान असून, त्यांनी तिच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

नाव बदललं

दीक्षा घेतल्यानंतर सलोनीचं नाव साध्वी श्री मल्लि दर्शना श्रीजी मसा असं ठेवण्यात आलं आहे.

5 दिवस उत्सव साजरा

उत्सवासाठी मंडप सजवण्यात आला होता. यावेळी सलोनीला हत्तीवर बसवण्यात आलं. तसंच अनेक वस्तू दान करण्यात आल्या. याशिवाय वस्त्र रंगोत्सव असे अनेक कार्यक्रम पार पडले.

कुटुंबासमोर घेतली दीक्षा

5 दिवसांच्या उत्सव कार्यक्रमात सलोनीने जैन समाजाचे गुरु आणि कुटुंबासमोर दीक्षा घेतली.

25 वर्षीय तरुणी झाली साध्वी

मध्य प्रदेशातील उज्जैन येथील 25 वर्षीय MBA उत्तीर्ण तरुणीने सर्व मोहमाया त्याग करत आयुष्यभर संयमाच्या मार्गावर चालण्याचा निर्णय घेतला आहे.

VIEW ALL

Read Next Story