पगार

नोकरीच्या ठिकाणी काही महत्त्वाचे निकष संस्थेच्या यशासोबतच तिथं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आनंद आणि त्यांच्या भविष्यावर भाष्य करत असतात. महिन्याला मिळणारा पगार आणि वर्षाला हाती येणारी मोठी रक्कम हे त्यातील महत्त्वाचे घटक.

नोकरी आणि पगार

एखाद्या ठिकाणी तुम्ही नोकरीसाठी किती काळ टिकणार हेच मुळात तुम्हाला मिळणारा पगार ठरवत असतो. कारण, कार्यक्षेत्रात प्रगती करण्यासाठी पगारवाढही तितकीच महत्त्वाची. देशाच्या कोणत्या शहरात सर्वाधिक पगार दिला जातोय तुम्हाला माहितीये?

सोलापूर

Average Salary Survey report नुसार महाराष्ट्रातील सोलापुरात सरासरी 2,810,092 रुपये इतका वार्षिक पगार दिला जातो. या यादीत हे शहर अग्रस्थानी आहे.

मुंबई

देशाची आर्थिक असणारी मुंबईसुद्धा या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे, या शहरात सरासरी 2,117,870 रुपये इतका वार्षिक पगार दिला जातो.

सिलिकॉन व्हॅली

भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखलं जाणारं बंगळुरू या यादीत तिसऱ्या स्थानावर असून, इथं एका वर्षात कर्मचाऱ्यांना सरासरी 2,101,388 इतका पगार दिला जातो.

दिल्ली

दिल्लीमध्ये कर्मचाऱ्यांना सरासरी 2,043,703 रुपये इतका पगार दिला जातो.

भुवनेश्वर

ओडिशातील भुवनेश्वर येथे सरासरी 1,994,259 रुपये इतका पगार दिला जातो. हे शहर यादीत पाचवम्या स्थानावर आहे.

जोधपूर

राजस्थानातील जोधपूरमध्ये सरासरी 1,944,814 इतका पगार दिला जातो. वर्षाकाठी मिळणाऱ्या पगारात हे शहर सहाव्या स्थानावर आहे.

पुणे

ज्या पुण्यात अनेक IT कंपन्या आहेत, तिथं कर्मचाऱ्यांना वर्षाला 1,895,370 रुपये इतका सरासरी पगार दिला जातो.

हैदराबाद

IT क्षेत्रातील अनेक संधी असणाऱ्या हैदराबादमध्ये 1,862,407 रुपये इतका सरासरी पगार दिला जातो. यामध्ये मॅनेजमेंट आणि व्यवसाय क्षेत्रांतील कर्मचाऱ्यांना सर्वाधिक पगार दिला जातो ही बाब समोर आली.

VIEW ALL

Read Next Story