श्रुती सोढी अभिनेत्री

या चित्रपटात श्रुती सोढी प्रमुख अभिनेत्री आहे. श्रुती एका पंजाबी मुलीची भूमिका साकारणार आहे. एका लहान गावातील मुलगा कसा IAS अधिकारी बनला याचा संघर्ष दाखवला जाणार आहे

चित्रपटांच शुटिंग सुरु

'अब दिल्ली दूर नही' या चित्रपटात गोविंद जयस्वालच्या संघर्षाची कहाणी दाखवण्यात आली आहे. याात इमरान जाहिद हा अभिनेता गोविंदची भूमिका साकारणार आहे.

मोठ्या पडद्यावर झळकणार

गोविंद जायसवालच्या संघर्षाची कहाणी (Struggle Story) आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. गोविंदच्या रिअल लाईफ स्टोरीवर (Real Life Story) चित्रपट बनवला जात असून या चित्रपटाचं नाव 'अब दिल्ली दूर नही' (Ab Dilli Door Nahi) असं आहे. 12 मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

लहानपणी आईचं छत्र हरवलं

गोविंदच्या आईचं त्याचा लहानपणीच निधन झालं. आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची होती, पण गोविंदने आपल्या गरीबीचा कधीही बाऊ केला नाही.

वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं

गोविंदने मिळवलेलं यश सोपं नाही. गोविंदचे वडिल सायलक रिक्क्षा चालवतात. घरची परिस्थिती बेताची. पण वडिलांनी गोविंदच्या शिक्षणात कधीच कमी पडू दिलं नाही.

2006 मध्ये दिली परीक्षा

बिहारमध्ये राहाणारा गोविंद जयस्वाल 2006 मध्ये UPSC परीक्षा पास करत IAS बनला. आज संपूर्ण देशात गोविंदच्या यशाची चर्चा आहे.

IAS अधिकाऱ्याचा यशस्वी प्रवास

कठोर मेहनत आणि प्रबळ इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. अशीच अशक्य गोष्ट शक्य करुन दाखवली आहे गोविंद जयस्वाल (Govind Jaiswal) या तरुणाने. प्रतीकुल परिस्थितीवर मात करत गोविंद IAS बनला आहे.

VIEW ALL

Read Next Story