आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नितीच्या माध्यमातून जीवनातील समस्यांवर मात करण्याचा मंत्र सांगितला आहे.

चाणक्य नितीत चांगल्या व दृष्ट व्यक्तींची ओळख कशी पटावी, याबाबतही सांगितले आहे.

चाणक्य सांगतात की या तीन प्रकारचे लोक तुमच्या आयुष्यात असतील तर याचा तुम्हाला फटका बसू शकतो.

सापाची जात असलेले हे तीन लोक तुमची विषाची परीक्षा घेऊ शकतात, कोण आहेत हे तीन लोक

दृष्ट पत्नी

चाणक्य म्हणतात की, सापाच्या विषापेक्षा दृष्ट व कपटी पत्नीच्या मनात विष असते. तुमची पत्नी सतत तुम्हाला उलटं बोलत असेल किंवा दुसऱ्यांसमोर तुमचा मान राखत नसेल तर यामुळं तुमच्या आयुष्यात वादळ येऊ शकते. अशा तणावपूर्व नात्यातून आधीच बाहेर या.

खोटारडा मित्र

मैत्रीचे नाते हे निखळ असायला हवं. आजकाल लोकं मुखवटा लावून फिरत असतात. समोर एक आणि पाठिमागे एक असा स्वभाव असतो. वेळीच अशा लोकांचा स्वभाव ओळखा आणि त्यांच्यापासून लांब राहा.

कपटी नोकर

कपटी नोकर हा विषारी सापाप्रमाणेच असतो. लालची नोकर विषाप्रमाणेच घातकी असतो. तुमच्या तोंडावर तो तुमचं कौतुक करेल पण तुमच्या पाठीमागे तुमच्या नावाचा गैरवापर करेल. यामुळं तुमच्या इमेजला धक्का लागू शकतो.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story