अँटिलिया म्हणजे काय? मुकेश अंबानी यांनी घराला का दिलं हेच नाव?

भारतातील आणि आशिया खंडातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती,

उच्चभ्रू भागात घर

मुकेश अंबानी मुंबईतील अतिशय उच्चभ्रू अशा अल्टामाऊंट रोड भागामध्ये अँटिलिया या त्यांच्या गगनचुंबी इमारतवजा घरात राहतात. 2012 मध्ये तब्बल 15000 कोटी रुपयांच्या खर्चात त्यांचं हे घर उभारण्यात आलं होतं.

जगातील दुसऱ्या क्रमांकाचं दुसरं महागडं घर

लंडनमधील बकिंघम पॅलेसनंतर अंबानींचं हे घर जगातील दुसऱ्या क्रमांकाचं दुसरं महागडं घर ठरत आहे.

कोणी केली बांधणी

400000 चौरस फुटांमध्ये उभारलेल्या या घराचं स्थापत्य पार्किन्स आणि विल्स यांनी डिझाईन केलं. तर, ऑस्ट्रेलियातील लीटन होल्डिंग्स कंपनीनं या घराची बांधणी केली.

घरातील सुविधा

50 जणांच्या आसनक्षमतेचं चित्रपटगृह, 3 हॅलिपॅड, 4 स्विमिंग पूल, जिम, हेल्थ सेंटर असणाऱ्या या घरात 9 लिफ्ट आहेत.

पौराणिक बेटाचं नाव

अंबानींच्या या घराच्या नावाचाही अर्थ अतिशय खास आहे. पोर्तुगाल आणि स्पेननजीक अटलांटिक महासागरात स्थित एका पौराणिक बेटाचं नाव आहे अँटिलिया.

शब्दाचा अर्थ

हे नाव Ante-Llha या पोर्तुगीज शब्दावरून घेण्यात आलं असून, त्याचा अर्थ होतो एक विरुद्ध बेट किंवा इतरांचं एक बेट. पुरेसा सूर्यप्रकाश, वाऱ्याचा झोत आणि समुद्राचं सुरेख दृश्य या घरातून पाहायला मिळतं.

VIEW ALL

Read Next Story