साडी नेसून व्हिडीओ पोस्ट केला अन्.., Instagram वरील ट्रोलिंगला कंटाळून दहावीतील मुलाची आत्महत्या

उज्जैनमधील मुलानं केली आत्महत्या

बुधावारी उज्जैनमध्ये राहणाऱ्या प्रियांशुनं आईच्या ओढणीनं गळफास घेत आत्महत्या केली.

प्रियांशु सोशल मीडियावर होता अॅक्टिव्ह

प्रियांशु हा सोशल मीडियावर मेकअप करतानाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करायचा.

मेकअप आणि साडी नेसल्यानं व्हायचा ट्रोल

प्रियांशुनं मेकअप केल्यानंतरचे फोटो किंवा साडी नेसल्याचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केल्यानंतर कमेंट करत नेटकरी त्याला ट्रोल करायचे.

प्रियांशुचे आई-वडील

प्रियांशुच्या आई-वडिलांचा तीन वर्षांपूर्वी घटस्फोट झाला. तो त्याच्या आईसोबत राहतो. त्याची आई ही वैद्यकीय कर्मचारी आहे.

आईला कशी मिळाली माहिती?

प्रियांशुची आई नेहमी प्रमाणे कामावर गेली असताना त्यानं घरी गळफास घेत आत्महत्या केली. आई जेव्हा संध्याकाळी घरी आली तेव्हा तिनं प्रियांशूला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिले. तेव्हा त्या ओरडू लागल्या तेव्हा आजूबाजूचे लोक आणि पोलीस पोहोचले.

प्रियांशु काय करायचा?

प्रियांशु हा एक उत्तम मेकअप आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट क्रिएटर होता.

इन्स्टाग्रामवर हजारो फॉलोवर्स

प्रियांशुचे इन्स्टाग्रामवर 16 हजार 800 फॉलोवर्स होते आणि त्याच्या 300 पोस्ट होत्या. त्यात तो साडी नेसून, वेगवेगळे ड्रेस परिधान करू, मेकअप करून, नेल पॉलिश आणि लिपस्टिक लावून व्हिडीओ आणि फोटो शेअर केला. (All Photo Credit : Pranshu Instagram)

VIEW ALL

Read Next Story