चहासोबत चुकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ

सकाळी उठल्यावर चहा-कॉफी घेण्याची सवय

आपल्यापैकी बर्‍याच लोकांना सकाळी उठल्यावर चहा-कॉफी घेण्याची सवय असते. प्रत्येक चहामध्ये किमान 2-3 तासांचे अंतर असणं आवश्यक आहे. पण चहासोबत काही पदार्थ खाल्ल्याने तुमचे आरोग्य बिघडू शकते.

दही आणि दह्याचे पदार्थ

चहा पिण्यापूर्वी किंवा त्यानंतर दही आणि दह्याचे पदार्थ खाऊ नका. अन्यथा पचनाच्या समस्या निर्माण होतात.

फळं

तुम्हाला सकाळी नाश्त्यात फळं खाण्याची सवय असेल तर चहा पिताना किंवा प्यायल्यानंतर लगेच खाऊ नका. चहा पिणे आणि फळे खाणे यामध्ये किमान एक तासाचे अंतर असावे.

रस

चहा पिण्यापूर्वी किंवा लगेचच कोणताही रस पिऊ नका. यामुळे गॅस निर्माण होतो.

हळद किंवा हळदयुक्त पदार्थ

चहा पिताना हळद किंवा हळदयुक्त पदार्थ अजिबात घेऊ नका. यामुळे पोटाशी संबंधित समस्या निर्माण होतात.

अंडी आणि मोड आलेले कडधान्य

चहासोबत कधीही कच्चे पदार्थ म्हणजे उकडलेली अंडी आणि मोड आलेले कडधान्य खाऊ नये. यामुळे शरीराला उपाय होऊ शकतो.

गार पाणी

चहा प्यायल्यावर लगेच गार पाणी पिऊ नये.

शेव, फरसाण

चहासोबत शेव, फरसाण खाणे टाळावे. यामुळे पचनसंस्थेशी निगडीत समस्या निर्माण होतात.

VIEW ALL

Read Next Story