उकडलेलं अंड

उकडलेलं अंड किती वेळात संपवावं? ते कधी खराब होतं?

आवरण न काढण्याचा सल्ला

अंड उकडल्यानंतर त्याचं अधिक काळासाठी सेवन करायचं नसेल तर त्याचं आवरण न काढण्याचा सल्ला दिला जातो. अंड्यावरील आवरण काढल्यास त्याचा अंतर्गत भाग हवेच्या संपर्कात येऊ तो अनेक जीवजंतूंच्या संपर्कात येतो.

थंड पाण्याचा वापर

अंड उकडल्यानंतर ते थंड पाण्यात ठेवावं. त्यानंतर लगेच सेवन करायचं नसल्यास ते आवरणासहीत फ्रिजमध्ये ठेवावं. जेणेकरून ते जीवजंतूंच्या संपर्कात येणार नाही.

हवाबंद डबा

अंड उकडल्यानंतर ते किमान दोन तासांच्या आत खाणं अपेक्षित असतं. फक्त त्यांच्यावरील आवरण काढलेलं नसावं. अंडी एका हवाबंद डब्यात ठेवल्यास ती अधिक काळ टीकतात.

दुर्गंधी

उकडलेली अंडी आवरण काढल्यानंतर फ्रिजमध्ये ठेवल्यास त्यांना दुर्गंधी येते. ही दुर्गंधी हाइड्रोजन सल्फाइडची असते. उकडलेली अंडी कधीच फ्रिजरमध्ये ठेवू नयेत.

अंड लगेच खायचं नसल्यास...

उकडलेलं अंड लगेच खायचं नसल्यास ते आवरणासहीत फ्रिजमध्ये ठेवून तुम्ही 7 दिवसांपर्यंत खाऊ शकता. पण, अंड्याचं आवरण काढल्यानंतर त्यामध्ये चिकटपणा असल्यास किंवा पिवळा भाग काळसर दिसल्यास ते खाणं टाळावं.

पोटाचे विकार...

सात दिवसांहून अधिक काळापासून फ्रिजमध्ये असणारं उकडलेलं अंड खाल्ल्यास अतिसार, उलट्या आणि पोटाच्या इतर काही समस्या सतावण्याचा धोका असतो.

VIEW ALL

Read Next Story