दिवाळसणाच्या निमित्ताने अनेक जणी पैठणी, बनारसी, कांजीवरम अशा साड्यांची खरेदी आवर्जून करतातच.
पण महाराष्ट्रीयन स्त्री चा पैठणीकडे जरा जास्तच ओढा असतो.
पैठणीची किंमत, तिचे प्रकार आणि खरी पैठणी कशी ओळखायची हे आज आपण पाहणार आहोत.
मोरबांगडी या प्रकारच्या पैठणीमध्ये पैठणीच्या काठांवर आणि पदरावर मोराचं डिझाईन विणलेलं असतं आणि त्या मोराच्या बाजुला एक गोलाकार असतो.म्हणूनच त्याला मोरबांगडी पैठणी म्हणतात. या पैठणीमध्ये संपूर्ण साडीवर जो बुट्ट असतो, त्यावरही अगदी लहान आकाराची मोरबांगडी बुटी असते.
हल्ली पैठणीचा हा प्रकारही बराच लोकप्रिय होत आहे. या प्रकारच्या पैठणीच्या काठांवर आणि पदरावर पोपटाचं डिझाईन असतं.तोता- मैना पैठणी म्हणूनही हा प्रकार ओळखला जातो. या पैठणीवरचा मोर बऱ्याचदा हिरव्या रंगाचा असतो. तसेच पोपटाचं डिझाईन उठून दिसण्यासाठी काठ प्लने सोनेरी रंगाचे असतात.
नावावरून लक्षात येतं की या पैठणीवर कमळाच्या फुलांचं डिझाईन असतं.काठ आणि पदर या दोन्ही ठिकाणी हे डिझाईन विणलेलं असतं. ७ ते ८ रंगांमध्ये हे कमळ डिझाईन दिसून येतं. अस्सल पैठणीची ओळख ही तिच्यामध्ये असणारी चमक पाहूनच लक्षात येते. वरील कोणतीही पैठणी घेतली तरी ती कमीतकमी ५ हजार ते १ लाख किंवा त्यापेक्षाही जास्त किमतीपर्यंत मिळते.
हातमागावर तयार केलेल्या पैठणीचे धागे पदराच्या दोन्ही बाजूंनी सारखेच दिसतात.
यात धागा कुठेच कापला जात नाही. दोन्ही बाजूंनी पैठणीवरची डिझाईन सारखीच असते.
याऊलट मशिनमध्ये बनवलेल्या पैठणीचे धागे दोन्ही बाजूंनी वेगळे असतात. मशिनमध्ये बनवल्यामुळे पदराच्या मागच्या बाजूने धागे खुले झालेले असतात.
खरी पैठणीही हातमाग यंत्रावरच तयार होते. हातमागावर तयार करण्यात आलेल्या पैठणीत शुद्ध जर आणि रेशमाचा वापर केला जातो. अशाप्रकारे तयार झालेली पैठणी ही 3 ते 4 पिढ्यांपर्यंत वापरली जाऊ शकते.