पुरुषांसाठी निरोगी आयुष्याचा गुरुमंत्र! 'या' 9 सवयी आजच्या आज लावून घ्या

नाश्ता टाळू नका

नाश्ता करणं कधीच टाळू नका. प्रोटीन्स, फळं असणारा नाश्ता तुम्हाला दिवसभर फ्रेश ठेवतो.

रोज पाणी पिऊन दिवसाची सुरुवात करा

रोज सकाळी उठल्यावर एक ग्लास पाणी पिऊन दिवसाची सुरुवात करा. रोज सकाळी पाणी प्यायल्याने तुमच्या शरीराला पुरेश्याप्रमाणात पाणी तर मिळतं शिवाय मेटाबायोलिझम म्हणजेच पचनालाही मदत होते.

अर्धा तास तरी व्यायाम करा

दिवसातून किमान अर्धा तास तरी व्यायाम करा. योगअभ्यास, व्यायामशाळा किंवा अगदी मॉर्निंग वॉकही चालेल.

काय खाता याकडे लक्ष द्या

काय खाता याकडे लक्ष द्या. हिरव्या भाज्या, ताज्या अन्नाला प्राधान्य द्या. अधिक आरोग्यदायी भोजन घ्या.

वारंवार पाणी पित राहा

ठराविक अंतराने पाणी पित राहा. सतत पाणी प्यायल्याने तुमच्या मेंदूला चालना मिळत राहते. पाण्यामुळे त्वचाही मुलायम राहते आणि पचनातील अडथळे दूर होतात.

कामादरम्यान ब्रेक घ्या

कामादरम्यान छोटे छोटे मेंटल ब्रेक घ्या. काही मिनिटं अगदी काहीच न करता नुसते बसून राहा. यामुळे तुम्हाला एकाग्रता वाढवण्यास मदत होते.

झोपेचं नियोजन करा

किमान 7 ते 8 तास झोप मिळेल अशापद्धतीने वेळापत्रकाचे नियोजन करा. झोपण्याच्या तासभर आधी मोबाईल वापरणं टाळा.

सतत मित्रांना भेटत राहा

मित्रांना वरचेवर भेटत राहा. मित्रांबरोबर, कुटुंबियांबरोबर बोला. संवाद साधणे हा मानसिक थकवा दूर करण्याचा उत्तम मार्ग आहे.

झोपण्यापूर्वी लिहून ठेवा

आज काय केलं, उद्या काय नियोजन आहे हे दिवस संपताना लिहून ठेवा. दुसऱ्या दिवसाची सुरुवात सकारात्मक करण्यासाठी याचा फायदा होतो.

VIEW ALL

Read Next Story