तुज आहे तुजपाशी... तुमच्याच हाती असलेल्या या 10 गोष्टी तुम्हाला 2024 मध्ये फार समाधानी ठेवतील

स्वत:बद्दल जागृक राहा

मानसिक आरोग्य उत्तम राहील याची काळजी घेण्यासाठी आधी स्वत:ला नीट समजून घ्या. तुमच्यासाठी काय योग्य काय नाही हे समजून घेणं फायद्याचं ठरतं.

आपल्या शरीराची काळजी घ्या

व्यायाम करा, दैनंदिन रुटीन आरोग्याच्या दृष्टीने सेट करा. आरोग्याला प्राधान्य द्या.

स्वत:शी प्रेमाने वागा

अनेकदा आत्मपरीक्षण करताना आपण स्वत:बद्दल फार वाईट विचार करतो. त्याऐवजी आपल्या चुका मान्य करुन स्वत:बद्दल जरा प्रेमाने विचार करा.

स्क्रीन टाइम कमी करा

सोशल मीडिया, मोबाईल फोन्सवर बराच वेळ व्यर्थ जातो. त्यामुळे या स्क्रीनपासून टप्प्याटप्यात दूर जाण्याचा प्रयत्न करा.

मद्याचं मर्यादित सेवन

मद्यपान करत असाल तर यंदाच्या वर्षी त्याचं प्रमाण कमी कराल याची काळजी घ्या. शारीरिक आरोग्याबरोबरच मद्याचा मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो.

ध्यानधारणा

मन शांत करण्यासाठी आणि धकाधकीच्या जीवनातून थोडा वेळ काढून ध्यानधारणा करा. स्वत:बद्दल विचारण्यासाठी आणि मन एकाग्र करण्यासाठी ध्यानधारणेचा फायदा होतो.

छंद जोपासा

रिकाम्या वेळेचा सदउपयोग करण्यासाठी छंद जोपासा. यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मोठ्या प्रमाणात मिळेल हे नक्की.

झोपेला प्राधान्य द्या

कामाइतकीच किंवा त्याहून अधिक झोप महत्त्वाची असते हे लक्षात घ्या. झोपेमुळे मन आणि शरीर दोन्ही रिफ्रेशन होतात. त्यामुळे झोपेला प्राधान्य देण्याची सवय लावा. दिवसातून किमान 8 तास झोपण्याचा प्रयत्न करा.

आभार माना, ऋणी राहा

जे काही आपल्याकडे आहे त्याबद्दल ऋणी राहा. कोणाहीबद्दल ऋण व्यक्त केल्याने मानसिक शांततेबरोबरच समाधानही मिळतं.

स्वत:ला आव्हान द्या

आपल्या ठराविक साचेबद्ध गोष्टींबरोबरच नव्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्हाला स्वत:च्या क्षमता आजमावून पाहता येतील.

VIEW ALL

Read Next Story