सुंदर, चमकदार आणि मुलायम त्वचेसाठी 'हे' स्किनकेअर नक्की ट्राय करा...

आपला चेहरा चमकदार व निरोगी रहावा असं आपल्या सर्वांनाचं वाटतं. त्यासाठी आपण खुप महागडे फेशियल देखिल करतो. पण आपम जर घरच्या घरी स्किन केअर फॉलॉ केलं तर चेहरा चमकदार आणि हायड्रेटींग दिस्तो

क्लीन्सर

तुमच्या त्वचेला योग्य असलेले सौम्य क्लीन्सरने तुमचा चेहरा निट धुवा. क्लीन्सर त्वचेतील तेल आणि प्रदूषक काढून तुमची त्वचा स्वच्छ करतं.

एक्सफोलिएटर

चेहऱ्याला नियमित एक्सफोलिएशन केल्याने त्वचेच्या डेड सेल्स निघुन त्वचा फ्रेश आणि निरोगी दिस्ते, एक्सफोलिएशन क्लॉग पोर्स सुद्धा साफ होतात ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर ग्लॉ दिसतो.

टोनर

मॉइश्चरायझिंग टोनर त्वचेची पीएच पातळीला नियंत्रीत ठेवतं पोर्स बंद करते आणि त्वचेसाठी योग्य असलेले उत्पादन चांगले शोषून घेण्यासाठी मदत करतात.

सिरम

सीरम तुमची त्वचा अधिक तेजस्वी बनवतात आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यास मदत करतात .

मॉइश्चरायझर

मॉइश्चरायझर त्वचेला हायड्रेट आणि पोषण देण्यास मदत करतात. यामुळे त्वचेतील, त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी तसेच त्वचेला मऊ आणि चमकदार बनवण्याचे काम करते.

सनस्क्रीन

नियमितपणे सनस्क्रीन वापरल्याने सनबर्न, त्वचेचा कर्करोग आणि अकाली वृद्धत्व टाळण्यास मदत होते. प्रत्येक सनस्क्रीनमध्ये काही प्रमाणात सन प्रोटेक्शन फॅक्टर (SPF) असतो जो UVB नावाच्या अल्ट्राव्हायोलेट (UV) प्रकाशाच्या विशिष्ट भागापासून संरक्षण करण्याची सनस्क्रीनची क्षमता दर्शवतो.

फेस मास्क

आठवड्यातून एकदा किंवा पंधरवड्यातून दोनदा हायड्रेटिंग किंवा ब्राइटनिंग फेस मास्क वापरल्याने तुमच्या त्वचेला ओलावा, पोषक तत्वे आणि चमक यांचा अतिरिक्त डोस मिळतो.

फेस ऑइल

कोरड्या त्वचेसाठी फेस ऑइल किंवा फेस ऑइल सीरम त्वचेसाठी उपयोगी ठरते चेदऱ्यावरील हायड्रेशन टिकवून ठेवण्यासाठी फेस ऑइल उपयुक्त ठरते.

नाईट क्रीम

रात्री नाईट क्रीम वापरल्यास झोपत तुमची त्वचा दुरुस्त होत अस्ते चेहऱ्यावरील पेशींच्या नूतनीकरणाला मदत करते आणि सकाळपर्यंत तेजस्वी त्वचा करण्यास मदत करते.

VIEW ALL

Read Next Story