चिमणी सोडा, येत्या काळात कधीच दिसणार नाहीत 'हे' 7 पक्षी!

वेगवेगळ्या आकाराचे पक्षी आणि त्यांचे रंगीबेरंगी सौंदर्य प्रत्येकाला भुलवतं. काही पक्षी आपण रोज पाहतो तर काही ठराविक हंगामात दिसतात. मात्र वाढत्या जंगलतोडीमुळे पक्षांच्या प्रजाती नष्ट झाल्या आहेत तर काही पक्षी दुर्मिळ झाले आहेत.

काकापो

पोपटाच्या जातकुळीतला पक्षी अत्यंत दुर्मिळ आहे. घनदाट जंगलात वास्तव्य करणारा हा पक्षी 80 वर्ष जगू शकतो. हे पोपट खास करून रात्रीच्या वेळी आढळतात. असं म्हणातात की, पोपट मादी ही एकावेळी 250 अंडी देते. हा पक्षी खास करून न्यूझीलंडच्या जंगलात आढळतो.

कॅलिफोर्निया कॉन्डोर

काळ्या रंगाच्या पंखावर पांढऱ्या रंगांचे ठिपके असलेला हा पक्षी गिधाड पक्षासारखा दिसतो. अमेरिकेत आढळणारा हा पक्षाच्या संवर्धनासाठी अमेरिका सरकार आणि पक्षीप्रेमी प्रयत्नशील आहेत.

आयव्हरी-बिल वुडपेकर

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या जंगलातून हा पक्षी आता नामशेष होत असल्याचं दिसून येत आहे. आकाराने लहान असलेल्या या पक्ष्याचं सौंदर्य मोहवणारं आहे. हा पक्षी झाडावरचे किटक खातो. झाडाच्या खोडाला चोच मारून तो आपलं घरटं तयार करतो. अत्यंत दूर्मिळ असणारा हा पक्षी जगभपरातील पक्षी प्रेमींकरीता आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.

धनेश पक्षी

भारतात आढळणारा धनेश पक्षाला इंडोनेशियामध्ये Javan Rhino Hornbill असं म्हणतात. हा पक्षी झाडाच्या ढोलीत राहतो. बहुतांश प्रमाणात हा पक्षी पावसाळ्यात घनदाट जंगलात आढळतो.

नॉर्दर्न बाल्ड आयबिस

या पक्ष्याच्या प्रजाती हळूहळू नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. काळ्या रंगाच्या या पक्षाची चोच लांब असून हा पक्षी मध्य आणि पूर्व अफ्रिकेतील दुर्मिळ असा पक्षी आहे.

घुबड

दिसायला अगदी भयानक वाटत असला तरी हा पक्षी बुद्धीमान आहे. शेताची नासधूस करणाऱ्या कीटक आणि विंचू यांची शिकार करतो. रात्रीच्या वेळी हा शिकारीसाठी जागा असतो म्हणून त्याला निशाचर असंही म्हणतात. जंगलात आढळणाऱ्या या पक्ष्याचं अस्तित्व हळूहळू नष्ट होत आहे.

न्यू कॅलेडोनियन ओव्हलेट नाईटजार

करडा आणि काळ्या रंगाचा हा पक्षाी न्यूझीलंडच्या जंगलात आढळतो. हा पक्षी अत्यंत दुर्मिळ असून याच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

VIEW ALL

Read Next Story