श्रद्धांजली आणि आदरांजली यामधील फरक काय?

श्रद्धांजली आणि आदरांजली हे शब्द वापरताना बऱ्याचदा होते चूक

या दोन्ही शब्दांचे अर्थ काय? आणि ते नेमके कधी वापरावे?

हे दोन्ही शब्द मृत्यू पावलेल्या लोकां संदर्भात वापरलजे जातात.

मृत्यूमुखी पडलेल्या लोकांविषयी भावना व्यक्त करताना या शब्दांचा वापर होतो.

अंजली म्हणजे ओंजळ. ओंजळी फुलं घेऊन अर्पण केली की त्याला पुष्पांजली असं म्हटलं जातं.

आदरांजली आणि श्रद्धांजली या दोन शब्दांमध्ये किंचीतसा फरक आहे.

श्रद्धेने अर्पण केलेली असते श्रद्धांजली. आदरपूर्वक अर्पण करतात ती आदरांजली.

आदर हा ज्ञात गोष्टींशी, व्यक्तींशी संबंधित असतो. तर श्रद्धा ही अज्ञात गोष्टींशी संबंधित असते.

ज्यांच्याविषयी आदर वाटतो त्यांना द्यायची आदरांजली. दिवंगत व्यक्तींना वाहायची ती श्रद्धांजली. असा या दोन शब्दांचा अर्थ आहे.

VIEW ALL

Read Next Story