दारु पिण्याआधी चिअर्स का म्हणतात? जाणून घ्या ग्लासाला ग्लास टेकवण्यामागची गोष्ट

मद्यपान करताना सर्वात आधी चिअर्स म्हणणं ही परंपराच आहे.

जर आपण मित्रांसह मद्यपानास बसलेले असलो तर ग्लासाला ग्लास लावून चिअर्स म्हटलं जातं.

असंही म्हटलं जातं की, चिअर्स म्हटल्यानंतर दारुचा ग्लास खाली ठेवू शकत नाही. आधी तुम्हाला एक घोट घ्यावा लागतो.

कॉकटेल्स इंडिया युट्यूब चॅनेलचे संस्थापक संजय घोष उर्फ दादा बारटेंडर यांच्यानुसार, चिअर्स करण्यामागे आपलं इंद्रियं कारणीभूत असल्याचं सांगितलं आहे.

चिअर्स करण्याची प्रक्रिया कान, नाक, डोळे, जीभ आणि त्वचा या इंद्रियांना संतृष्ट करणारी असते असं त्यांचं म्हणणं आहे.

जेव्हा मद्यपान करण्यासाठी लोक ग्लास उचलतात तेव्हा सर्वात आधी त्याला स्पर्श करतात. यावेळी डोळे मद्याला पाहतात.

मद्यपान करताना जीभ त्या ड्रिंकची चव चाखते. यादरम्यान नाक त्या ड्रिंकचा वास घेत असतं.

तसंच कानाचा वापर करण्यासाठी चिअर्स म्हटलं जातं. दारु पिण्याचा पूर्ण अनुभव घेण्यासाठीच चिअर्स म्हटलं जातं.

Disclimer: ही माहिती फूड अँड वाइन एक्स्पर्ट्सच्या हवाल्याने देण्यात आली आहे. याच्या माध्यमातून मद्यापानास वाढ देण्याचा हेतू नाही.

VIEW ALL

Read Next Story