मद्यपान करायचं म्हटलं तर सोबत चखना नसेल असं होणारच नाही.

चखना म्हटलं तर त्यात शेंगदाणा नाही असं होणारच नाही. मेन्यूत लिहिलं नसलं तरी समजून जायचं की, दारुसोबत शेंगदाणेही मिळणार.

पण दारुसोबत चखन्यात शेंगदाणा नेहमी का दिला जातो याचा विचार तुम्ही कधी केला आहे का?

आवड की जुनी पंरपरा

तुम्ही म्हणाल की मद्यपान करणाऱ्यांना शेंगदाणे खाणं आवडत असावं किंवा जुनी परंपरा असावी. पण यामागील खरं कारण जाणून घ्या.

दारुसह शेंगदाणा देण्यामागे लालसा असणाऱ्या बार आणि पब मालकांचा हात आहे.

तुम्ही जर नीट लक्ष दिलं तर शेंगदाणा खाल्ल्याने आपला गळा सुकतो. त्यामुळे प्रत्येक शेंगदाण्यासह आपण समोर ठेवलेल्या मद्याचा घोट घेत राहतो.

मद्याचा एक-एक घोट घेताना आपण कधी इच्छेपेक्षा जास्त मद्य कसे प्यायलो हेच लक्षात येत नाही आणि बार मालकांना बिलातून याचा फायदा मिळतो.

ग्राहकांनी जास्त मद्य प्यावं आणि आपला धंदा व्हावा यासाठी ही आखलेली एक रणनीतीच आहे. पण आता तर हा सगळ्यांच्या सवयीचा भाग झाला आहे.

पण काही तज्ज्ञांच्या मते मद्यपान करताना शेंगदाणे खाणं फायद्याचं आहे. हा कॉम्बो शरिरातील पाणी कमी झाल्यास रिहायड्रेशनला मदत करतं.

VIEW ALL

Read Next Story