वाइन पाण्यात मिसळून का पित नाही? 99 टक्के लोकांना माहिती नाही कारण

व्होडका, रम, व्हिस्की हे सोडा, कोल्ड ड्रिंक्स किंवा पाण्यात मिक्स करुन त्याचा आस्वाद घेतला जातो. पण जेव्हा वाइनचा विचार केला जातो तेव्हा ती नुसतीच घेतली जाते. ती पाण्यासोबत का पित नाही, हे तुम्हाला माहिती आहे का?

आपण आपल्या आजूबाजूला कधीची कोणाला वाइन पाण्यासोबत पिताना पाहिली नाही. वर्षानुवर्ष असाच समज आहे की, वाइन आणि पाण्याचं सेवन एकत्र केलं जातं नाही. यामागील कारण काय आहे त्याबद्दल जाणून घेऊयात

पण काही लोक असे आहेत जे वाइनमध्ये थोडं पाणी घालतात, कारण त्यांना वाटतं असं केल्यामुळे हँगओव्हर टाळण्यास मदत होईल. पण याची कोणीही खात्री देत नाहीत.

खरं तर वाइन ग्लासमध्ये पोहोचण्यापूर्वीच ती अशी बनवली जाते की त्याला इतर कुठल्याही गोष्टी गरज नसते. वाइनच्या चवीची विशेष काळजी घेतली जाते.

वाइनमेकर्स त्यांच्या आयुष्यातील अनेक वर्षे उत्तम वाइन तयार करण्यासाठी त्यांचं तंत्र परिपूर्ण करण्यात घालवत असतात. त्यामुळे वाइनमध्ये पाणी घालणे हा त्यांच्या मेहनतीवर पाणी फेरण्यासारखं आहे.

जर वाइनमध्ये पाणी मिक्स केल्यास त्याची चव खराब होते आणि ती पातळ होते. त्याशिवाय वाइनमध्ये पाणी मिक्स केल्यामुळे रासायनिक रचना बदलते. हे ऑक्सिजन प्रक्रियेसारखं असून ते वेगाने कार्य करतं.

VIEW ALL

Read Next Story