केस खूपच गळतायत? या पद्धतीने घरीच बनवा आवळ्याचे तेल

थंडीच्या दिवसांत किंवा अनियमित जीवनशैलीमुळं अलीकडे केस गळतीच्या समस्यांमध्ये तीव्रतेने वाढ होत आहे.

केसगळती रोखण्यासाठी महागडी औषधे किंवा तेल आणली जातात. मात्र, आर्येुवेदिक उपायांनीही तुम्ही केस गळती थांबू शकता

केसांसाठी आवळा बहुगुणकारी आहे. घनदाट व लांबसडक केसांसाठी तुम्ही आवळ्याचे तेल बनवून वापरु शकता

त्यासाठी सर्वप्रथम एका कढाईत नारळाचे तेल १ कप आणि वाटीभर कडिपत्त्याची 25 पाने व पाच ते सात आवळे कापून टाका

15 ते 20 मिनिटे हे मिश्रण शिजवून घ्या. कडिपत्ता आणि आवळ्याचा अर्क त्यात उतरल्यावर गॅस बंद करुन घ्या.

मिश्रण थंड झाल्यावर गाळून एका हवाबंद बाटलीत बंद करुन ठेवा

केसगळती, केसांचे तुटणे, केस घनदाट व मजबूत होणे. त्याचबरोबर केसांना नैसर्गिक चमक येणे इत्यादी लाभ आवळ्यामुळं केसांना होतात.

आठवड्यातून दोनदा हे तेल केसांना लावा. यामुळे केसगळतीची समस्या हळूहळू कमी होण्यास मदत मिळेल.

VIEW ALL

Read Next Story