कोकण रेल्वे

अरे देवा! कोकण रेल्वेचा खोळंबा; पाहा बदललेलं वेळापत्रक

किमान वेळात कमाल प्रवास

Konkan Railway News : किमान वेळात कमाल प्रवास करण्याची मुभा देणाऱ्या आणि एका भारावणाऱ्या वाटेवरून भारावणारा निसर्ग दाखवणाऱ्या कोकण रेल्वेला अनेकांचीच पसंती.

रेल्वेमार्ग

कोकण रेल्वेमुळं राज्याच्या कोकण प्रांतात असणाऱ्या अनेक गावांमध्ये पोहोचण्याचा मार्ग अधिक सुकर झाला. अशा या रेल्वेमार्गाला अनेकांचीच पसंती.

सावर्डा-रत्नागिरी

येत्या 23 फेब्रुवारी 2024 ला मात्र कोकण रेल्वे मार्गावर खोळंबा झाल्याचं पाहायला मिळू शकतं. कोकण रेल्वेवरील सावर्डा-रत्नागिरी विभागात देखभाल-दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणाप आहे.

मेगाब्लॉक

या कामानिमित्त शुक्रवारी, 23 फेब्रुवारी रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक सकाळी 7 ते 9.30 वाजेपर्यंत साधारण अडीच तासांसाठी लागू असेल.

रेल्वेगाड्या विलंबाने धावतील

ब्लॉकमुळं कोकण रेल्वेवरील रेल्वेगाड्या विलंबाने धावतील. तर, गाडी क्रमांक 12617 एर्नाकुलम - हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस मडगावदरम्यान 1.45 तासांसाठी थांबवण्यात येईल.

रेल्वे उशिरानं

गाडी क्रमांक 20923 तिरुनेलवेली - गांधीधाम एक्स्प्रेसचा मडगावदरम्यान एक तास 10 मिनिटांसाठी थांबवण्यात येईल. त्यामुळे या दोन्ही रेल्वेगाड्यांसह इतर रेल्वेगाड्याही निर्धारित वेळेपेक्षा उशिरानं धावतील.

VIEW ALL

Read Next Story