खासगी ट्रॅव्हल्सवाले जास्त पैसे घेतायत? 'येथे' करा तक्रार

कोकणी माणूस गणपतीसाठी गावी जाण्याच्या लगबगीत आहे.

ट्रेन आणि बसच्या तिकिट फूल झाल्यावर प्रवासी खासगी बसचा पर्याय निवडतात.

पण खासगी बसवाले या संधीचा फायदा घेत मनमानी तिकिट दर आकारतात.

रत्नागिरी जिल्हा परिवहन विभागाने प्रवाशांची फसवणूक होऊ नये म्हणून एक उपाययोजना केली आहे.

जिल्हा परिवहन अधिकाऱ्यांनी खासगी बसससेवेसाठी दर निश्चित केले आहेत.

यानुसार खासगी बस व्यावसायिकांनी केली तर प्रवाशांनी थेट व्हॉट्सअपवर तक्रार करावे असं आवाहन करण्यात आलंय.

तिकीट दराच्या 50 टक्के अधिक आकारणी करण्यास खासगी बसेसना परवानगी असते.

मात्र त्यापेक्षा जास्त भाडं आकारल्यास प्रवाशी तक्रार नोंदवू शकतात.

अवाजवी भाडे आकारणाऱ्यांविरोधात प्रवाशांना 02352-225444 या व्हॉट्सअपनंबरवर तक्रार करता येणार आहे.

येथे वाहन, वाहनाचा नोंदणी क्रमांक आणि भाडे आकारणी तिकीटचा फोटो पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

VIEW ALL

Read Next Story