कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

पावसाचा जोर वाढला

सातारा (satara) जिल्ह्यात विशेषत: कोयना भागात पावसाचा जोर गेल्या दोन दिवसांपासून वाढत आहे.

सातारा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सातारा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आल्याने पुढचे दोन दिवस पावसाचा जोर राहणार आहे.

50 टक्क्यांवर पाणीसाठा

अशातच आता पश्चिम महाराष्ट्रासाठी महत्वाच्या असलेल्या कोयना धरणाचा पाणीसाठा आता 50 टक्क्यांवर गेल्यानंतर आता मोठा निर्णय घेण्यात आलाय.

पाण्याचा विसर्ग सुरू

पाणीसाठा वाढल्याने पायथा वीज गृहातून 1050 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे.

सतर्कतेचा इशारा

विसर्ग सुरु करण्यात येणार असल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.

वीज निर्मिती सुरु

येत्या काही दिवसात पावसाची शक्यता पाहता विसर्ग सुरु झाल्यानं आता बंद पडलेली वीज निर्मिती सुरु होणार आहे.

72.19 अब्ज घन फूट पाणीसाठा

सातारा जिल्ह्यातील धरणांमध्ये एकूण 72.19 अब्ज घन फूट पाणीसाठा असून धरणांमधील पाणीसाठा एकूण क्षमतेच्या 48.49 टक्के इतका झालाय.

VIEW ALL

Read Next Story