आवर्जून भेट द्यावी अशी 10 धरणं

महाराष्ट्रात अनेक धरणं आहेत. मात्र यामधील काही धरणांना पावसाळ्यात आवर्जून भेट द्यावी इतकं तेथील वातावरण नयनरम्य असतं. अशाच 10 धरणांबद्दल जाणून घेऊयात...

भंडारदरा विल्सन धरण (Bhandardara Wilson Dam)

भंडारदरा धरण आणि रंधा धबधबा हे पर्यटकांना दर पावसळ्यात खुणावते. भंडारदरा अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यात आहे.

गंगापूर धरण (Gangapur Dam)

गंगापूर धरण नाशिक जिल्ह्यात आहे. हे धरण गोदावरी नदीवर असून येथील परिसर फारच सुंदर असून पावसाळ्यामध्ये या ठिकाणा नक्कीच एकदा तरी भेट दिली पाहिजे.

भावली धरण (Bhavali Dam)

भावली धरण नाशिकमधील इगतपूरीजवळ आहे. दरवर्षी या ठिकाणी पर्यटकांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळतं. हे धरण मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गापासून अवघ्या काही किलोमीटरवर आहे.

जायकवाडी धरण (Jayakwadi Dam)

गोदावरी नदीवर असलेले औरंगाबाद जिल्ह्यामधील जायकवाडी धरण हे राज्यातील एक प्रमुख धरण आहे.

राधानगरी धरण (Radhanagari Dam)

राधानगरी धरण कोल्हापूर जिल्ह्यात आहे. हे धरण भोगावती नदीवर असून येथील परिसर नयनरम्य आहे. राजर्षी शाहू महाराजांनी शंभर वर्षांपूर्वी सिंचनाचे महत्त्व ओळखून या धरणाच्या बांधकामाला सुरुवात केलेली.

कोयना धरण (Koyna Dam)

कोयना धरण हे कोयना नदीवर असलेले महाराष्ट्रातील सर्वांत मोठे धरण आहे. हे धरण सातारा जिल्ह्यातील कोयना नगर येथे आहे.

खडकवासला धरण (Khadakwasla Dam)

पुण्यापासून हाकेच्या अंतरावर आणि निवांत जागेच्या शोधात असाल तर खडकवासला धरणाला भेट देऊ शकता.

भुशी धरण (लोणावळा) (Bhushi Dam Lonavala)

लोणावळ्यामधील भुशी धरण हे पर्यटकांच्या आवडत्या मान्सून स्पॉटपैकी एक आहे. हे धरण मुंबई-पुण्यापासून हाकेच्या अंतरावर आहे.

पवना धरण (Pavana Dam)

मुंबई पुणेकरांना हाकेच्या अंतरावर असलेलं आणि दरवर्षी पर्यटकांनी गजबजलेलं धरण म्हणजे, पवना धरण! पुण्याहून कामशेत मार्गे हे धरण 65 किलोमीटर दूर आहे. या धरणातून पिंपरी-चिंचवडला पाणी पुरवठा केला जातो.

मुळशी धरण (Mulshi Dam)

मुळशी धरण हे पुणे जिल्ह्यातील मुळा नदीवरील धरण आहे. मुंबई, पुण्यापासून हे धरण हाकेच्या अंतरावर असल्याने पावसाळ्यात येथे पर्यटाकांची मोठी गर्दी होते.

नियम पाळा

धरणाच्या परिसरामध्ये जाताना नको ते धाडस करुन जीव धोक्यात टाकू नये. येथील सर्व लिखित सूचनांचं पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे.

VIEW ALL

Read Next Story