राजमाची

लोणावळ्यानजीक असणारा हा ट्रेक पुण्यापासूनही जवळ पडतो. मुंबईतून इथं काही तासांतच पोहोचला येतं. इथं पावसाच्या दिवसांमध्ये अनेक धबधबे तुम्हाला चिंब भिजवतात.

रायरेश्वर

भोर गावापासून साधारण 30 किमी अंतरावर असणारा रायरेश्वराचा ट्रेक साधारण दोन तासांतच पूर्ण होतो. महाराष्ट्राच्या इतिहासात या ठिकाणाला अनन्यसाधारण महत्त्वं.

रायगड

मुंबई आणि पुण्यापासून नजीकच असणारा रायगड साधारण तीन ते चार तासांमध्ये सर करता येतो. लहान मुलांना घेऊन या ट्रेकला येऊ नका.

कळसुबाई

महाराष्ट्रातील सर्वाधिक उंचीचं शिखर अशी ओळख असणाऱ्या कळसुबाईचा ट्रेक चार साडेचार तासांत पूर्ण होतो. पावसातून या ट्रेकची बातच काही और.

तोरणा

पुण्यापासून 75 किमी अंतरावर असणारा हा ट्रेक साधारण अडीच तासांत पूर्ण होतो. स्वराज्याची तोरणमाळ अशी या गडाची ओळख.

विसापूर

हुबेहूब लोहगडाप्रमाणं असणारा विसापूरचा किल्ला मुंबईपासून 100 किमी अंतरावर आहे. पावसाच्या दिवसांमध्ये या परिसराचं सौंदर्य द्विगुणित झालेलं असतं.

हरिश्चंद्रगड

अनेक ट्रेकर्सना आव्हानात्मक वाटणारा हरिश्चंद्रगड पावसातून वेगळं रुप दाखवतो. नशिबवान असा तर इथं पावसातून तुम्हाला इंद्रवज्रही दिसेल.

अंधारबन

नावातच सारंकाही असणारा अंधारबनचा ट्रेक हा मान्सूनदरम्यान अनेकांच्या Wishlist मध्ये असतो. गर्द झाडी आणि पावसाच्या पाण्याचाच आवाज इथं तुम्ही अनुभवू शकता.

रोहिडा

रोहिडा किंवा विचित्रगड अशी या गडाची ओळख. ट्रेकिंगच्या वाटेवर असणाऱ्या घळींमुळं हा ट्रेक अधिकच थरारत वाटतो.

कोथळीगड

कर्जत मुरबाड नजीक असणारा हा आणखी एक सुरेख ट्रेक. इथं अंतिम टप्प्यातील चढाईचा थरार एकदातरी अनुभवा.

VIEW ALL

Read Next Story