weekend getaways near mumbai for family

आठवडी सुट्टीसाठी किमान प्रवासात कमाल आनंद देणारी ठिकाणं हवीयेत? ही घ्या यादी

कर्नाळा

पनवेलपासून काही अंतरावरच असणाऱ्या कर्नाळा पक्षी अभयारण्य आणि नजीकच्या भागाला भेट देणं दोन दिवसांच्या सुट्टीत सहज शक्य होतं. इथं तुम्हाला जंगल जवळून पाहता येईल.

नाशिक

मुंबईतून नाशिकच्या दिशेनं जाणाऱ्या वाटा आता तुम्हाला फार कमी वेळातच तिथे पोहोचवतात. इथं तुम्ही सुला वाईन यार्ड्सपासून, नाशिकच्या मिसळीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या ठिकाणांना भेट देऊ शकता.

माथेरान

मध्य रेल्वेमार्गानं दोन तासांवर असणाऱ्या नेरळला पोहोचून तुम्ही माथेरानसाठी रिक्षा किंवा शेअर टॅक्सी करू शकता. गर्द झाडी आणि हवेतील गारवा इथं तुमचा क्षीण घालवण्यास मदत करेल.

चिकनी

मुख्य प्रकाशझोतात असणाऱ्या अलिबागला भेट देत असाल तर, तिथूनच काही किलोमीटर पुढे गेलं असता चिकनी हा सुरेख समुद्रकिनारा लागतो. इथे गर्दी कमी असल्यामुळं तुम्ही समुद्राच्या पाण्यात डुंबून त्या वाळूत मनसोक्त खेळू शकता.

पाली

अष्टविनायकांपैकी एक असणाऱ्या पालीला भेट दिल्यानंतर तुम्ही नजीकचा परिसर धुंडाळू शकता. इथं सुधागड हा विस्तीर्ण किल्ला पाहण्याजोगा आहे.

पाचगणी

तीन- चार तासांहून अधिक पुढे जाऊन प्रवास करण्याची तयारी असेल तर जास्तीचा एक तास खर्ची घालून तुम्ही पाचगणी गाठू शकता. शहराच्या उकाड्यातून आणि धकाधकीपासून दूर इथं तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात वावरण्याची संधी मिळेल.

माळशेज घाट

मध्य रेल्वेमार्गानं दोन तासांवर असणाऱ्या नेरळला पोहोचून तुम्ही माथेरानसाठी रिक्षा किंवा शेअर टॅक्सी करू शकता. गर्द झाडी आणि हवेतील गारवा इथं तुमचा क्षीण घालवण्यास मदत करेल.

पावना लेक

मुंबईपासून काही अंतरावर असणाऱ्या पावना लेकला तुम्ही भेट देऊन इथली शांतता अनुभवू शकता. स्थानिकांनी पुरलेल्या कँपिंग सुविधांचाही तुम्ही आनंद लुटू शकता.

दमण

पोर्तुगीजांच्या वसाहतीकरणाचा इतिहास असणाऱ्या या भागाला लाभलेला समुद्रकिनारा त्याच्या सौंदर्यात आणखी भर टाकतो.

VIEW ALL

Read Next Story