पुण्यातील अपघाताची देशभर चर्चा; पण 'पोर्शे'चा नेमका अर्थ काय?

पोर्शेची देशभर चर्चा

पुण्यातील कल्याणीनगरमध्ये झालेल्या आलिशान पोर्शे गाडीच्या अपघातात दोघांना प्राण गमवावा लागला असून सध्या या प्रकरणाची महाराष्ट्राबरोबरच देशभरात चर्चा आहे.

नेमका अर्थ काय?

मात्र या प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या पोर्शे या जर्मन बनावटीच्या कार कंपनीच्या नावाचा नेमका अर्थ काय आहे तुम्हाला ठाऊक आहे का?

कंपनीचं संपूर्ण नाव माहितीये का?

तुम्हाला पोर्शे हे कंपनीचं संपूर्ण नाव वाटत असेल तर तसं नाहीये. या कंपनीचं पूर्ण नाव Dr. Ing. h.c. F. Porsche AG असं आहे.

नावातील अक्षरांचा अर्थ काय?

पोर्शे कंपनीच्या संपूर्ण नावातील Dr हे डॉक्टर म्हणून आहे. त्यामधील Ing. h.c. हे इंजनिअर ऑनररी डिग्री यासाठी लिहिण्यात आलं आहे. त्यानंतर कंपनीच्या नावातील F हे संस्थापकाच्या नावातील पहिलं अक्षर आहे.

नावातील AG चा अर्थ काय?

कंपनीच्या नावातील AG हे आपल्याकडील Crop किंवा Ltd या प्रमाणे कंपनी कोणत्या प्रकारची आहे दर्शवतं. AG चा अर्थ Aktiengesellschaft असा होतो. म्हणजेच ही शेअर्सच्या माध्यमातून चालणारी कंपनी आहे असं यातून निर्देशित होतं.

वेगळ्याच हेतूने स्थापन केलेली कंपनी

वाहन उद्योगाशीसंबंधित इंजिनिअरींग कन्सल्टन्सी फर्म म्हणून फर्डिनांड पोर्श यांनी एक कंपनी सुरु केली होती. त्यानंतर वर्षभराने या कंपनीने प्रत्यक्षात कार बनवण्यास सुरुवात केली.

कंपनीचं नाव कुठून आलं?

पोर्शे या परदेशी गाडीच्या कंपनीच्या मालकाच्या अडनावावरुनच कंपनीला पोर्शे हे नाव ठेवण्यात आलं आहे.

बिटेलसाठी त्यांनीच दिलं योगदान

पोर्शे कंपनीच्या माध्यमातून कार निर्मिती करण्याआधी फर्डिनांड पोर्श यांनी वोसवॅगन कंपनीची बिटेल ही कार साकारण्यात मोलाचं योगदान दिलं होतं.

1948 साली पहिली कार फॅक्ट्रीबाहेर पडली

1948 साली पोर्शे कंपनीच्या माध्यमातून पहिल्यांदाच कंपनीचं पोर्शे हे नाव आणि लोगोसहीत कार फॅक्ट्री बाहेर पडली.

पोर्शे शब्दाचा अर्थ काय?

पोर्शे हा शब्द मूळचा जर्मन शब्द आहे. या शब्दाचा अर्थ मूळ म्हणजेच Origins असा होतो.

VIEW ALL

Read Next Story