कडक राहू मीन राशीत करतोय प्रवेश, 'या' 3 राशींचं भविष्य चमकणार

Rahu Transit 2023: सर्वात मायावी आणि क्रोधित ग्रह म्हणून ओळखला जाणारा राहू आता आपली राशी बदलणार आहे. या संक्रमणामुळे 3 राशींवर परिमाण होणार असून भरपूर धनलाभ होणार आहे.

राहू क्रूर आणि मायावी छाया ग्रह

Rahu Transit 2023: राहू ग्रह क्रूर आणि मायावी छाया ग्रह मानला जातो. असे म्हणतात की ज्या लोकांच्या कुंडलीत राहु कमजोर स्थितीत असतो, त्यांना फरा नुकसान सहन करावं लागतं. नोकरी-व्यवसायातही त्यांना नुकसान सहन करावं लागतं.

राहु बलवान असणारे यशस्वी

दुसरीकडे, ज्यांच्या कुंडलीत राहु बलवान आहे, ते त्यांच्या करिअरमध्ये यशस्वी होतात. तसंच ते राजकारणातही चांगले नाव कमावतात.

30 ऑक्टोबर 2023 रोजी मीन राशीत प्रवेश

राहु ग्रह आता 30 ऑक्टोबर 2023 रोजी मीन राशीत प्रवेश करणार आहे. या संक्रमणामुळे 3 राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत हे जाणून घ्या...

तुळ (Libra)

राहूचे गोचर तुमच्या राशीच्या सहाव्या भागात होणार आहे. अशा स्थितीत हे गोचर तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. तुम्हाला कुठूनतरी अचानक पैसे मिळू शकतात. तसंच तुम्ही तुमच्या विरोधकांवर विजय मिळवू शकाल. कोर्टात एखादं प्रकरण प्रलंबित असेल तर तुमच्या बाजूने निकाल लागेल. नोकरदारांना वेतनवाढीसोबत प्रमोशनही मिळू शकते.

कर्क (Cancer)

कर्क राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळू शकते. तुमची रखडलेली कामं पूर्ण होऊ शकतात. जे लोक परदेशात जाण्याचा विचार करत आहेत, त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते. तुमच्या घरी वाहन किंवा मालमत्ता येऊ शकते. तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढतील आणि खर्च नियंत्रणात असतील.

वृष (Taurus)

राहू ग्रहाच्या गोचरने तुम्हाला अचानक धनप्राप्ती होऊ शकते. या राशी बदलामुळे तुम्ही बेटिंग, लॉटरी किंवा शेअर मार्केटमध्ये चांगली कमाई करू शकता. तुमचे आरोग्य चांगले राहील. तुम्ही लहान आणि लांब पल्ल्याचा प्रवास करू शकता. कौटुंबिक बाजूने चिंतेची काही बाब नसेल.

VIEW ALL

Read Next Story