Chanakya Niti : दोन शरीर एक जीव; तरी नवरा-बायकोने 'ही' गोष्ट मात्र एकत्र करूच नये

नवरा-बायको म्हणजे दोन शरीर एक जीव असतात असं म्हणतात. पण काही गोष्टी नवरा-बायकोने एकत्र चुकूनही करू नये, नाहीतर वैवाहिक आयुष्य उद्ध्वस्त होईल. असा सल्ला आचार्य चाणक्य यांनी दिला आहे.

आचार्य चाणक्यनुसार पती पत्नीने आपल्या खासगी आयुष्यातील गोष्टी एकमेकांना सांगू नये. त्या गोष्टी त्यांनी आपल्यापुरतीच मर्यादित ठेवाव्यात नाहीतर त्यांचं संसार तुटू शकतो.

नवरा-बायकोत वाद होणं अगदी सामान्य बाब आहे. पण दोघांपैकी एखाद्याचा रागिष्ट स्वभाव हे संसारासाठी घातक ठरु शकतं. अशावेळी रागिष्ट व्यक्ती आपल्या पार्टनरसोबत चांगलं नातं निर्माण करु शकतं नाही.

पती-पत्नीवर संपूर्ण कुटुंबाचीही जबाबदारी असल्यामुळे त्यांना वर्तमानातील खर्च सांभाळत भविष्यासाठीही बचत करायला पाहिजे. त्यामुळे दोघांनीही विचारपूर्वक पैसा खर्च करावा. फालतू खर्च टाळावा.

पती-पत्नीने आपल्या नात्याची मर्यादा कधीच ओलांडू नयेत, नाहीतर त्यांच्या नात्याला तडा जातो.

खोटं हे कुठलंही नातं असो ते तोडतं. नवरा बायकोचं नातं हे सत्य आणि प्रामाणिकपणावरच उभं असतं. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story