सध्या महालक्ष्मीचं व्रत सुरु आहे. धनाच्या देवीला समर्पित हे व्रत 22 सप्टेंबर 2023 ते 6 ऑक्टोबर 2023 पर्यंत सुरु राहणार आहे.

महालक्ष्मी व्रतात देवी लक्ष्मीची विशेष कृपा असते. असं म्हणतात की, या दिवसांमध्ये एक विशेष कार्य केल्यास लक्ष्मी सात जन्माची गरिबी दूर करते.

श्री सूक्तम पाठ हिंदू धर्मात धनप्राप्तीसाठी मुख्यत्वे लक्ष्मीची पूजा केली जाते. काही लोक कुबेर आणि सूर्य देवाचीही उपासना करतात.

काही लोक दानधर्मही करतात. पण सूक्तम पाठ जास्त मंगलकारी असल्याचं मानलं जातं.

काय आहे सूक्तम?

श्री सूक्तम हे लक्ष्मीची प्रार्थना करण्यासाठी एक मंत्र आहे. याला लक्ष्मी सूक्तम असंही म्हटलं जातं. ऋग्वेदमधून हे घेण्यात आलं आहे.

लक्ष्मीच्या कृपेसाठी हा मंत्रजप केला जातो. श्रीसूक्तात 15 श्लोक आहेत.

ऋग्वेदात उल्लेख आहे त्याप्रमाणे श्रीसूक्ताप्रमाणे जोदेखील श्रद्धेने देवीची पूजा करतो, तो 7 जन्म गरीब होत नाही असं म्हटलं जातं.

पण यासाठी नियम आणि सावधानगिरी बाळण्याची गरज असते. त्याशिवाय याचा पूर्ण लाभ मिळत नाही.

पूजन कसं करायचं?

लक्ष्मीचा एक फोटो ठेवा आणि त्यासमोर तुपाचा दिवा लावा. यानंतर श्री सूक्तमचा जप करा.

प्रत्येक श्लोकानंतर लक्ष्मीला फूल अर्पण करा. जप झाल्यानंतर लक्ष्मीची आरती करा. लक्ष्मीसह श्रीहरीचीही पूजा करा.

जर तुम्हाला रोज हे करणं शक्य नसेल तर शुक्रवार किंवा पौर्णिमेला जप करा. लाल किंवा गुलाबी आसनावर बसूनच श्री सूक्तम म्हणा.

अंगावर सफेद किंवा गुलाबी वस्त्र घालूनच जप करा. कधीही एकट्याने लक्ष्मीची पूजा करु नका. तुमच्यासह घरातील सदस्य असणं महत्त्वाचं आहे.

VIEW ALL

Read Next Story