धार्मिक पुस्तके

गुरु पुष्य योगामध्ये देव गुरु बृहस्पतीचा प्रभाव अधिक असतो. अशा परिस्थितीत तुम्ही गुरु पुष्य योगामध्ये धार्मिक पुस्तकं खरेदी करू शकता.

नाणे

गुरु पुष्य योगाच्या दिवशी व्यक्तीने सोन्याचे नाणे किंवा चांदीचे नाणे खरेदी करावे. हे तुमच्या प्रगतीसाठी देखील उपयुक्त ठरतं.

हरभरा डाळ

गुरु पुष्य योगात तुम्ही हरभरा डाळ खरेदी करूनही तुमचा घरात सुख आणि समृद्धी वाढवू शकता. हळद आणि हरभरा डाळ याशिवाय पिवळ्या रंगाचे कपडे, पितळ, तूप इत्यादी देखील खरेदी करू शकता.

हळद

गुरु पुष्य योगात हळद खरेदी करणे देखील शुभ मानलं जातं. जर तुम्हाला सोने खरेदी करता येत नसेल तर तुम्ही हळद खरेदी करु शकता.

सोने

सोने हे सुख आणि समृद्धीचं प्रतीक आहे. गुरु पुष्य योगात सोने खरेदी केल्याने तुमची संपत्तीत वाढ होते.

गुरु पुष्य योगासह 5 शुभ योग

या दिवशी अमृत सिद्धी योग आणि सर्वार्थ सिद्धी योग देखील सकाळी 05.26 ते संध्याकाळी 05.54 पर्यंत आहे. रवियोग सकाळी 05:26 ते सायंकाळी 05:54 पर्यंत आहे, त्यानंतर रात्री 09.12 ते दुसऱ्या दिवशी 26 मे रोजी सकाळी 05.25 पर्यंत आहे.

गुरु पुष्य योगासह 5 शुभ योग

या दिवशी वृद्धी योग संध्याकाळी 06:00 ते 08:00 पर्यंत आहे. गुरु पुष्य योग सकाळी 05:26 ते संध्याकाळी 05:54 पर्यंत आहे.

गुरु पुष्य योग 2023 किती काळ?

25 मे रोजी गुरु पुष्य योग सूर्योदयापासून संध्याकाळी 05:54 पर्यंत आहे. या दिवशी संध्याकाळी 05:54 पासून आश्लेषा नक्षत्र सुरू होतोय. अशा स्थितीत 25 मे रोजी सकाळपासून 05:54 वाजेपर्यंत तुम्ही शुभ वस्तूंची खरेदी करू शकता.

गुरु पुष्य योग कधी तयार होतो?

ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र येते तेव्हा हा दुर्लभ गुरु पुष्य योग तयार होतो. गुरु पुष्य योगाला गुरु पुष्य नक्षत्र योग असेही म्हणतात. हा योग अत्यंत शुभ आणि फलदायी असतो.

'या' वस्तू खरेदी केल्याने वाढेल भाग्य आणि संपत्ती

25 मे रोजी कोणतेही शुभ कार्य कराल तर त्यात अनेक पटींनी वाढ होईल. या दिवशी तुम्ही लग्न सोडून इतर सर्व शुभ कार्य करू शकता. पण काही वस्तूंची खरेदी केल्या धनवृद्धी होईल.

25 मे रोजी गुरु पुष्यासह 5 शुभ योग!

25 मे रोजी गुरु पुष्य योगासह 5 शुभ योग तयार होत आहेत. वृद्धी योग, सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग आणि रवियोग जुळून आले आहेत.

VIEW ALL

Read Next Story