28 ऑक्टोबरला वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण होणार आहे. भारतात हे चंद्रग्रहण दिसणार आहे. याच दिवशी शरद पोर्णिमाही आहे.

हे चंद्रग्रहण रात्री 11.32 ते 3.56 पर्यंत असणार आहे. ग्रहणांचा सूतक काळ दुपारी 2 वाजून 32 मिनिटांनी सुरु होईल.

ज्योतीषतज्ज्ञांच्या मते, आगामी चंद्रग्रहण मेष राशीत लागणार आहे. त्यामुळे ग्रहणाचा सर्वाधिक परिणाम याची राशीवर होणार आहे.

मेष राशीला आर्थिक नुकसान होऊ शकतं. गुंतवणूक, कर्ज किंवा खर्चाशी संबंधित समस्या जाणवतील. धनसाठ्यात अडचण होईल.

चंद्रग्रहणाच्या काळात मेष राशीच्या लोकांनी आर्थिक व्यवहार टाळावा. शॉर्टकटने पैसे कमावणं महाग पडू शकतं.

घर किंवा कार्यालयात वाद होऊ शकतात. सतत चिडचिड होईल. संपत्तीच्या वादातून कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागू शकतात.

जवळपास एक महिना हे चढउतार सहन करावे लागू शकतात. विनाकारण तणावामुळे त्रस्त असाल. मित्र किंवा नातेवाईकांशी वाद होऊ शकतो.

एखादी जुनी व्याधी अडचणी वाढवू शकते. डोळे आणि पोटाशी संबंधित समस्यांपासून सावधान राहा. खाताना, पिताना दुर्लक्षपणा करु नका,

या काळात आपल्या वडिलांच्या प्रकृतीची विशेष काळजी घ्या. रोग, आजारामुळे वाढलेला खर्च तुमचं बजेट बिघडवू शकतात.

VIEW ALL

Read Next Story