जूनमध्ये सूर्य, शनीसोबत 'या' ग्रहांचं गोचर

कोणत्या राशींना धनलाभाची शक्यता?

जून ग्रह गोचर

जून महिना हा ग्रह आणि नक्षत्रांच्या दृष्टीकोनातून खास असणार आहे. या महिन्यामध्ये मोठ्या ग्रहांच्या स्थितीमध्ये बदल होणार आहे.

बुध गोचर

जून महिन्याच्या सुरुवातीला 7 जूनला बुध मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे.

सूर्य गोचर

सूर्य 15 जून रोजी मिथुन राशीत प्रवेश करणार आहे.

शनी वक्री

17 जून रोजी कुंभ राशीमध्ये शनी पूर्वगामी होईल.

बुध गोचर

21 जून रोजी बुध पुन्हा वृषभ राशीत मावळेल.

बुध गोचर

24 जून रोजी बुध मिथुन राशीत प्रवेश करेल.

मेष (Aries)

या राशींच्या व्यक्तींसाठी नव्या संधी उपलब्ध होणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ उत्तम असेल. नोकरीच्या ठिकाणी तुमची भरपूर प्रगती होणार आहे. जमीन किंवा मालमत्ता खरेदी-विक्रीमध्ये तुम्हाला बराच फायदा मिळेल.

मिथुन (Gemini)

या राशींच्या व्यक्तींना जून महिना लाभदायक राहणार आहे. तुम्हाला कामात यश मिळणार आहे. तुम्ही जे ध्येय ठेवलं असेल ते साध्य करण्यात यशस्वी होणार. कामाच्या ठिकाणी तुमचं उच्चस्तरावरून कौतुक होईल.

कन्या (Virgo)

जर तुमच्या डोक्यात नवीन बिझनेसविषयी काही कल्पना असतील तर त्यावर काम करण्यास सुरुवात करावी. तुम्ही करत असलेल्या क्षेत्रात प्रगतीच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. तुमचे इच्छित परिणाम प्राप्त करण्यास सक्षम असणार आहात.

तूळ (Libra)

तुम्हाला नशिबाची पूर्णपणे साथ मिळणार आहे. तुमचं आरोग्य या काळात सुधारणार आहे. तुम्हाला हवे असतील तसे शुभ परिणाम दिसतील. तुम्ही घेतलेले महत्वाचे निर्णय यशस्वी ठरणार आहेत. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story