Raksha Bandhan 2023: तुम्हाला भाऊ नाही? मग यांना बांधा राखी

रक्षाबंधनाचा सण हा भाऊ बहिणीच्या प्रेम नात्याचा सण असतो. पण जर तुम्हाला भाऊ नसेल तर. अशावेळा शास्त्रानुसार तुम्ही या गोष्टींना बांधू शकता राखी.

धार्मिक मान्यतेनुसार ज्या बहिणींना भाऊ नाही अशा बहिणींनी काही झाडांना राखी बांधून रक्षाबंधन साजरी करु शकता.

कडुनिंब, वड, आवळा, केळी, शमी आणि तुळशीला राखी बांधून बहिणी रक्षाबंधनाचा सण साजरा करु शकता.

आवळा, कडुनिंब आणि वडामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या देवतांचा वास असतो. त्यामुळे झांडाना राखी बांधल्यास त्रिदेव प्रसन्न होतात.

तुळशीला राखी बांधल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि घराची आर्थिक स्थितीही चांगली राहते.

शमीच्या रोपाला राखी बांधल्याने शनिदेव आणि महादेव प्रसन्न होतात आणि वरदान देतात.

केळीच्या झाडात भगवान विष्णू वास असते ते आपल्याला आशिवार्द देतात.

हनुमानजीला राखी बांधणे अतिशय शुभ मानले जाते. कुंडलीतील मंगळ दोष नाहीसे होतात.

पूजेच्या कलशाला राखी बांधणे खूप शुभ मानले जाते. कलशाच्या मुखावर भगवान विष्णू, कलशाच्या कंठात भगवान शिव आणि कलशाच्या मूळ भागात ब्रह्मदेव वास करतात असं म्हणतात.

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story