येथे रक्षाबंधनाला भावांना मृत्यूचा शाप देतात बहिणी!

भावा-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. यादिवशी बहिणी भावाच्या मनगटाला राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. तर, भाऊ बहिणीच्या रक्षणाचे वचन देतोय.

रक्षाबंधन हा सण संपूर्ण देशात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. छत्तीसगडमधील एका प्रथेनुसार, बहीणी भावाला अल्पायुषी होण्याचा शाप देते.

छत्तीसगढ येथील जशपूर समुदायाकडून अशी प्रथा पाळण्यात येते. या प्रथेनुसार, बहीणीने भावाला शाप दिल्यानंतर त्याचे प्रायश्चित्तदेखील घेते.

भावाला अल्पायुशी होण्याचा शाप दिल्यानंतर त्याचे प्रायश्चित्त म्हणून जीभेवर काटा टोचून घेतात. या प्रथेमागे एक कारणदेखील आहे.

खरं तर असा शाप हा भावाच्या रक्षणासाठीच दिला जातो. यमापासून आपल्या भावाचे रक्षण करण्यासाठी बहिणींनी त्याला शाप देण्याची मान्यता आहे.

यामागे एक कहाणी देखील सांगितली जाते. यमराज एकदा अशा व्यक्तीला घेऊन जाण्यासाठी आले होते ज्याच्या बहिणीने त्याला कधीही शाप दिलेला नाही. यानंतर या समाजातील बहिणींनी आपल्या भावांच्या रक्षणासाठी ही प्रथा पाळण्यास सुरुवात केली.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story