World Cup 2023 : वर्ल्डकपआधीचं टीमला मोठा धक्का, 'हा' वेगवान गोलंदाज वनडे वर्ल्डकपमधून बाहेर!

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर यावर्षीच्या वन-डे वर्ल्डकप खेळणार नसल्याची माहिती समोर आलीये.

क्रिकेट विश्वातील सर्वश्रेष्ठ गोलंदाजांपैकी एक असलेला इंग्लंडचा तेज गोलंदाज जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे या वर्षीचा भारतात होणारा वन-डे वर्ल्डकप खेळणार नसल्याची माहिती आहे.

गेल्या काही महिन्यांपासून जोफ्रा आर्चर पाठीच्या दुखापतीने त्रस्त होता. त्याच्या पाठीची शस्त्रक्रियाही झाली होती. त्यानंतर त्याने क्रिकेट विश्वात पुनरागमन केलं.

जोफ्रा आर्चर 2023 साली आयपीएल मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळला होता. पण एकाही सामन्यात तो पूर्वीसारख्या लयात तसच पूर्णपणे फीट दिसला नव्हता. त्यानंतर पुन्हा त्याला दुखापत झाली असून, त्यावर योग्य ते उपचार करत आहे.

इंग्लंडमध्ये झालेल्या 2019 च्या वन-डे वर्ल्डकपमध्ये अंतिम सामन्यात न्यूझीलंडला मात देऊन इंग्लंडने पहिल्यांदाचं आपलं नाव वन-डे वर्ल्डकपवर कोरले होते.

यावेळी अंतिम सामन्यात सुपर ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी करत इंग्लंडसाठी 2019 च्या वर्ल्डकपमध्ये खऱ्या अर्थाने जोफ्रा हिरो ठरला होता.

VIEW ALL

Read Next Story