नॅथन लायनने कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास रचला

मैदानात उतरताच रचला इतिहास

नॅथन लॉयनने 28 जून रोजी एक खास इतिहास रचला आहे. नॅथनने सलग 100 कसोटी सामने खेळले आहेत.

क्रिकेटच्या इतिहासातील पहिला गोलंदाज

सलग 100 कसोटी सामने खेळणारा नॅथन लायन हा क्रिकेटच्या इतिहासातील पहिला गोलंदाज ठरला आहे.

नॅथनच्या आधी कोणी केलाय रेकॉर्ड?

नॅथनच्या आधी अॅलिस्टर कुक (159), अॅलन बॉर्डर (153), मार्क वॉ (107), सुनील गावस्कर (106) आणि ब्रेंडन मॅक्युलम (101) यांनी सलग 100 कसोटी सामने खेळले आहेत.

2011 मध्ये केली होती करिअरची सुरुवात

नॅथन लॉयनने ऑस्ट्रेलियासाठी पहिला कसोटी सामना 2011 मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळला होता.

कशी आहे कारकिर्द

नॅथन लॉयनने आतापर्यंत 122 कसोटी सामन्यांमध्ये 495 बळी घेतले आहे. यासोबत येत्या काही दिवसांत आणखी पाच बळी घेऊन नॅथन नवा विक्रम रचण्याची शक्यता आहे.

मला याचा खूप अभिमान आहे - नॅथन लॉयन

मला याचा खूप अभिमान आहे. जेव्हा मला सांगण्यात आले की मी खेळणार नाही तो दिवस चांगला आठवतो. मी त्या दिवशी ब्रॅड हॅडिनच्या पलंगावर बसून याबद्दल बोलत होतो, असे नॅथन लॉयनने म्हटलं

नागपूरमध्येही रचला होता विक्रम

बॉर्डर गावसकर ट्रॉफीच्या सामन्यात फेब्रवारी महिन्यात नॅथन लायनने कसोटी क्रिकेटमध्ये 30 हजार चेंडू फेकण्याचा विक्रम केला होता. अशी कामगिरी करणारा तो जगातील सहावा ठरला होता.

ऑस्ट्रेलियाच्या संघासाठी यशस्वी कामगिरी

ऑस्ट्रेलियाच्या पुरुष कसोटी संघात लियॉनचे योगदान स्पष्टपणे त्याच्या प्रभावी कौशल्याच्या पलीकडे आहे. तसेच हा त्याचा सलग 100 वा कसोटी सामना आहे.

ऑस्ट्रेलियाची जबरदस्त सुरुवात

ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा यांनी पहिल्या डावात दमदार सुरुवात केली आहे. (सर्व फोटो - नॅथन लॉयन/ Instagram)

VIEW ALL

Read Next Story