जय शाहांचं शिक्षण किती? 124 कोंटींचे मालक असलेल्या शाहांना BCCI किती पैसे देते?

प्रतिष्ठीत कुटुंबातील व्यक्ती

भारतीय क्रिकेट बोर्डाचे म्हणजेच बीसीसीआयचे सचिव जय शाह हे प्रतिष्ठीत कुटुंबातील आहेत.

सगळीकडे चर्चेत

आयपीएलपासून वर्ल्ड कपर्यंत चर्चेत असलेल्या जय शाह यांचे वडील भारताचे केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते अमित शाह हे आहेत.

बीसीसीआयचे खरे बॉस

कागदोपत्री पाहिल्यास बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी हे प्रमुख आहेत. मात्र जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डाचा प्रत्यक्ष कारभार जय शाहाच पाहतात. तेच बीसीसीआयचे खरे बॉस आहेत.

घराणेशाहीवरुन टीका

अनेकदा जय शाहांवर घराणेशाहीवरुन टीका केली जाते. बऱ्याचदा त्यांच्यावर शैक्षणिक पात्रतेवरुनही टीका होताना दिसते.

1988 ला जन्म

जय शाह यांचा जन्म 22 सप्टेंबर 1988 रोजी गुजराती कुटुंबातील अमित शाह आणि सोनल शाह यांच्या पोटी झाला.

शालेय शिक्षण

प्रसारमाध्यमांमधील वेगवगेळ्या वृत्तांनुसार जय शाह यांनी शालेय शिक्षण गुजरातमध्येच पूर्ण केलं.

शिक्षण किती?

जय शाह यांनी बी. टेकपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे.

खासगी विद्यापीठातून पदवी

जय शाह यांनी निर्मा विद्यापीठ या अहमदाबादमधील खासगी विद्यापीठातून पदवी घेतली.

जय शाहांकडे ही जबाबदारीही

बीसीसीआयचे सचिव पदाबरोबरच जय शाहांकडे आशियाई क्रिकेट काऊन्सिलचं अध्यक्षपदही आहे.

एकूण संपत्ती 124 कोटी

जय शाहांची एकूण संपत्ती ही 124 कोटी रुपये इतकी असल्याचं प्रसारमाध्यमांमधील वृत्तांमध्ये अनेकदा म्हटलं आहे.

बीसीसीआय किती पैसे देते?

बैठकीला उपस्थित राहणे आणि क्रिकेट संदर्भातील इतर कामांसाठी जय शाहांना बीसीसीआय 3.50 लाख रुपये मानधन देते.

VIEW ALL

Read Next Story