ना माजी खेळाडूला, ना संसद सदस्याला हे शोभा देत नाही. अशा घटनांमुळे क्रिकेटचे नुकसान होतं, असं मत रजत शर्मा यांनी व्यक्त केलं होतं. त्यानंतर आता गंभीरने जोरदार प्रत्युत्तर दिल्याचं पहायला मिळतंय.
निवडणूक लढवून खासदार झाल्यामुळे गौतम गंभीरचा अहंकार आणखी वाढला. विराटची लोकप्रियता त्याला किती खटकते, असं रजत शर्मा म्हणाले होते.
यही कलयुग़ है जहां भगोड़े अपनी अदालत चलाते हैं, असं म्हणत गंभीरने हल्लाबोल केला आहे. गंभीरच्या निशाण्यावर यावेळी रजत शर्मा (Rajat Sharma) असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
प्रेशरचं कारण देऊन दिल्ली क्रिकेटमधून पळून गेलेला माणूस क्रिकेटची चिंता म्हणून सशुल्क पीआर विकण्यास उत्सुक दिसतो, असं गौतम गंभीर ट्विटमध्ये म्हणाला आहे.
विराट आणि गंभीर (Virat Gambhir Fight) या दोघांवर टीका देखील होतीये. मात्र, हा वाद काही शांत होण्याचं नाव घेत नाहीये. गौतम गंभीरने केलेल्या एका ट्विटमुळे (Gautam Gambhir Tweet) सध्या चांगलाच वाद आणखीनच पेटलाय.
आयपीएल 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा विराट कोहली (Virat Kohli) आणि लखनऊ सुपरजायंट्सचा मेटॉर गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्यात झालेल्या भांडणामुळे क्रिडाविश्वात एकच चर्चा रंगली आहे.
,Gautam Gambhir चा निशाणा कोणावर?