भारतीय क्रिकेट संघातील सध्याचे मॅचविनर खेळाडू रवींद्र जडेजा, श्रेयस अय्यर आणि जसप्रीत बुमराह यांचा 6 डिसेंबरला वाढदिवस असतो.

पण केवळ या तिघांचाच नाही तर जगभरातील तब्बल 11 दिग्गज खेळाडू 6 डिसेंबरला आपला वाढदिवस साजरा करतात.

म्हणजे एक प्लेईंग इलेव्हन या दिवशी वाढदिवस साजरा करते. यात तब्बल पाच भारतीय खेळा़डूंचा समावेश आहे.

6 डिसेंबरला रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह आणि श्रेयस अय्यर यांच्याव्यतिरिक्त करुण नायर आणि आरपी सिंह यांचाही वाढदिवस असतो.

परदेशी खेळाडूंमध्ये अँड्र्यू फ्लिंनटॉप, ग्लेन फिलिप्स, हॅरी टेक्टर, सीन एरवीन, वॉशब्रूक आणि माल्कम जारवीस यांचा वाढदिवस असतो.

यापैकी न्यूझीलंडचा ग्लेन फिलिप्स आणि आयर्लंडचा हॅरी टेक्टर हे दोघचं क्रिकेट सध्या क्रिकेट खेळतात इतर सर्व खेळाडू निवृत्त झाले आहेत.

या सर्व खेळाडूंवर वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

VIEW ALL

Read Next Story