भारतात या वर्षाच्या अखेरीस म्हणजे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणार आहे.

10 ऑगस्टपासून विश्व चषक स्पर्धेच्या तिकिटांची विक्री होण्याची शक्यता आहे. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ई-तिकिट मिळणार नाहीत.

त्यामुळे तिकिटं ऑनलाईन मिळणार की ऑफलाईन याबाबत क्रिकेट चाहत्यांमध्ये साशंकता आहे.

एका रिपोर्टनुसार ठरवून दिलेल्या क्रिकेट स्टेडिअमच्या तिकिट खिडकीवर विश्व चषकाची तिकिटं मिळतील.

तर एका रिपोर्टनुसार तिकिटांची ऑनलाईन विक्री होईल. बीसीसीआयने तिकिटांच्या किमतीबाबत सर्व क्रिकेट असोसिएशनकडून सल्ले मागितले आहेत.

10 ऑगस्टपासून विश्वचषकाची तिकिटं विक्रीसाठी उपलब्ध होतील असा विश्वास बीसीसीआयने व्यक्त केला आहे. वर्ल्ड कपच्या वेळापत्रकातही काही बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एकदिवसीय विश्व चषकाच्या तिकिट विक्रीसाठी देशभरात सात ते आठ अधिकृत सेंटरची घोषणा केली जाईल. त्यानंतर आसन व्यवस्ठा ठरवली जाणार आहे.

भारतीय क्रिकेट बोर्ड पहिल्यांदाच एकट्याने स्पर्धेचं आयोजन करणार आहे. विश्व चषक स्पर्धेची सुरुवात 5 ऑक्टोबरला होणार आहे, तर 19 नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवला जाईल.

गत विजेता संघ इंग्लंड आणि उपविजेत्या न्यूझीलंड दरम्यान विश्वचषक स्पर्धेचा सलामीचा सामना खेळवला जाईल. हा सामना अहमदाबाच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमध्ये होईल.

टीम इंडियाच्या मिशन वर्ल्ड कपची सुरुवात 8 ऑक्टोबरपासून होईल. भारताचा पहिला सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी रंगणार आहे.

VIEW ALL

Read Next Story