टीम इंडियाचा उगवता स्टार म्हणून यशस्वी जयस्वालकडे पाहिलं जात आहे. आयपीएलच्या सोळाव्या हंगामात दमदार कामगिरी करणाऱ्या यशस्वीने थेट टीम इंडियात एन्ट्री घेतली.

आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स आणि स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबईसाठी खेळणाऱ्या यशस्वीने आपल्या आक्रमक फलंदाजीने क्रिकेट जगताचं लक्ष वेधून घेतलं आहे.

या डावखुऱ्या फलंदाजाचं नुकतंच टीम इंडियात खेळण्याचं स्वप्न पूर्ण झालं. त्यानंतर आता त्याचं आणखी एक स्वप्न पूर्ण झालं आहे. ज्याची त्याला मोठ्या कालावधीपासून प्रतीक्षा होती.

यशस्वी जयस्वालने मुंबईत मोठं घरं घेण्याचं आपलं स्वप्न पूर्ण केलं आहे. आपल्या संपूर्ण कुटुंबासह तो मुंबईतल्या 5 BHK फ्लॅटमध्ये शिफ्ट झाला आहे.

या फ्लॅटची किंमत करोडोत असून याची एक झलक यशस्वीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केली आहे. या फोटोत तो आई-वडिल आणि बहिण-भावासह दिसत आहे.

यशस्वीने आपल्या पोस्टमध्ये घराच इंडटेरिअर डिझायन करणाऱ्या Mi Casa स्टूडिओ आणि मीनल विचारे यांचे धन्यवाद मानले आहेत.

आपल्या कुटुंबासह स्वप्नातल्या घरात शिफ्ट झाल्याने यशस्वी जयस्वाल प्रचंड आनंदी आहे. आता लवकरच यशस्वी एशियन गेम्स 2023 मध्ये खेळताना दिसणार आहे.

VIEW ALL

Read Next Story