पहिल्या कसोटीतील पराभवामुळे टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट टेबलमध्येही नुकसान सहन करावा लागलं आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट टेबलमध्ये टीम इंडियाची पाचव्या क्रमांकावर घसरण झाली आहे.

WTC च्या यंदाच्या हंगामात टीम इंडियाने पाच कसोटींपैकी दोन सामन्यात विजय मिळवला आहे. तर दोन सामन्यात पराभव पत्करावा लागलाय. एक सामना ड्ऱॉ झाला.

टीम इंडियाच्या खात्यात 26 पॉईंट जमा झालेत. बांगलादेशने यंदाच्या हंगमात दोन कसोटी सामन्यांपैकी एक सामना जिंकला आहे. बांगलादेश चौथ्या क्रमांकावर आहे.

या क्रमवारीत ऑस्ट्रेलिया संघ टॉपवर आहे. ऑस्ट्रेलियाने 10 कसोटी सामन्यांपैकी 6 कसोटी सामने जिंकलेत.

या क्रमवारीत दक्षिण आफ्रिका दुसऱ्या तर न्यूझीलंड तिसऱ्या क्रमांकावरआहे. पाकिस्तान सहाव्या, वेस्टइंडिज सातव्या, इंग्लंड आठव्या आणि श्रीलंका नवव्या स्थानावर आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशिपचा हा तिसरा हंगाम आहे. कसोटी सामना जिंकल्यास 12, ड्रॉ झाल्यास 4 तर सामना टाय झाल्यास 6 पॉईंट मिळतात.

VIEW ALL

Read Next Story