टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांना पूत्ररत्न प्राप्ती झाली. 20 तारखेला सोशल मीडियावर अनुष्काने गुड न्यूज शेअर केली.

विराट कोहली आणि अनुष्का शर्माने आपल्या छोट्या राजकुमारचं नाव अकाय असं ठेवलंय. सोशल मीडियावर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

अनुष्काने मुलाची गुड न्यूज दिल्यानंतर 'अकाय' हे नाव सोशल मीडियावर त्याचं नाव जबरदस्त ट्रेंड होतंय.

विराट आणि अनुष्काच्या मुलाची क्रेझ वाढलीय. 24 तासातच अकाय नावाची हजारो फेक अकाऊंट्स सोशल मीडियावर बनवण्यात आलेत.

इन्स्टाग्राम, ट्विटरवर केवळ अकाय टाईप केल्यावर बोगस अकाऊंटची लीस्टच समोर येतेय.

जन्माला येताच विराट आणि अनुष्काचा मुलगा सोशल मीडिया स्टार बनला आहे. लोकांना त्याच्याबद्दल जाणून घेण्यात उत्सुकता वाढलीय.

अनुष्का शर्माने 15 फेब्रुवारीला गोंडस मुलाला जन्म दिला. मुलाच्या जन्माच्या पाच दिवसानंतर अनुष्काने ही गोड बातमी चाहत्यांबरबर शेअर केली.

VIEW ALL

Read Next Story