IND vs AFG : शुन्यावर बाद झाला पण कॅप्टन म्हणून रोहित ठरला 'बाप'

टीम इंडियाचा विजय

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळवल्या गेलेल्या दुसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात टीम इंडियाने 6 गडी राखून विजय मिळवला.

इतिहास रचला

दुसऱ्या सामन्यातील विजयासह टीम इंडियाने मालिका देखील खिशात घातली आहे. या विजयासह शुन्यावर बाद झालेल्या कॅप्टन रोहित शर्माने इतिहास रचला आहे.

कॅप्टन रोहित शर्मा

भारताकडून टी-ट्वेंटीमध्ये सर्वाधिक सिरीज नावावर करणारा कॅप्टन म्हणून रोहित शर्माची नोंद झाली आहे.

12 मालिका विजय

रोहित शर्माने कॅप्टन्सी करताना 12 मालिकेत विजय मिळवले आहेत. या मालिकेतील विजयासह रोहितने विराट कोहलीला मागे टाकलंय.

विराट कोहली

विराट कोहलीने त्याच्या कॅप्टन्सीच्या काळात 11 टी-ट्वेंटी मालिकेवर नाव कोरलं होतं. आता रोहितने एक पाऊल पुढे टाकत 12 मालिका नावावर केल्यात.

धोनी

तर अनेक वर्ष टी-ट्वेंटी संघाची जबाबदारी सांभाळणाऱ्या धोनीला फक्त 8 टी-ट्वेंटी मालिका जिंकता आल्या आहेत.

VIEW ALL

Read Next Story