भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान तिसरा एकदिवसीय सामना राजकोट मैदानावर खेळवण्यात आला. वर्ल्ड कपपूर्वीचा हा शेवटचा एकदिवसीय सामना होता.

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाहुण्या ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकत पहिली फलंदाजी घेतली. तुफान फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाने 7 विकेटवर 352 धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज मिचेल मार्शने सर्वाधिक 96 धावा केल्या. तर स्टिव्ह स्मिथने 74 धावा कुटल्या.

भारताततर्फे जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर चायनामन फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला विकेट मिळाल्या.

पण या सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियन खेळाडू प्रचंड उन्हामुळे त्रस्त झाले होते. त्यांनी ड्रिंक्ससाठी सामन्यात अनेकवेळा ब्रेक घेतला.

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ तर उन्हामुळे हैराण झाला होता. भर मैदानातच त्याच्यासाठी खुर्ची मागवण्यात आली होती.

स्टिव्ह स्मिथच्या डोक्यावर बर्फाची बॅग ठेवण्यात आली. त्यानंतर त्यााला काहीसं बरं वाटलं. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

VIEW ALL

Read Next Story