टीम इंडियाबरोबर विमानात असलेली ही 'मिस्ट्री गर्ल' कोण? रिंकूच्या फोटोने चर्चांना उधाण

दक्षिण आफ्रिकेला भारतीय संघ रवाना

भारताच्या टी-20 क्रिकेट संघातील सदस्य दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत.

सूर्यकुमार यादव कर्णधार

10 डिसेंबरपासून भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेमध्ये टी-20 मालिका खेळणार आहे. सूर्यकुमार यादव या संघाचं नेतृत्व करत आहे.

रिंकूने शेअर केले फोटो

भारतीय संघातील नवा फिनिशर रिंकू सिंहने भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला रवाना झाला तेव्हाचे फोटो सोशल मीडियावरुन शेअर केलेत.

विमानात क्लिक केला फोटो

कुलदीप यादव, रिंकू सिंह, तिलक वर्मा, अर्शदीप सिंग, भारताचे फिल्डींग कोच टी. दिलीप आणि अन्य सहकारी या फोटोत दिसत आहेत.

आधीच्या फोटोत दिसतेय तरुणी

या फोटोंमध्ये एक तरुणीही दिसत आहे. ही तरुणी कोण असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या तरुणीचं नाव रजल अरोरा असं आहे.

कोण आहे ही तरुणी?

रजलच्या इन्स्टाग्राम बायोनुसार ती टीम इंडिया आणि आयपीएलची डिजीटल आणि मीडिया मॅनेजर आहे.

मागील 8 वर्षांपासून करतेय काम

मागील 8 वर्षांपासून रजल बीसीसीआयबरोबर काम करत आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 60 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

राहुलच्या बायकोची चांगली मैत्रीण

रजल ही के. एल. राहुलची पत्नी आणि अभिनेत्री अथिया शेट्टीची चांगली मैत्रीण आहे.

दोघींचे एकत्र अनेक फोटो

रजल आणि अथिया या दोघींनी एकत्र क्लिक केलेले अनेक फोटो सोशल मीडियावर आहेत.

भारताचे टी-20 आणि एकदिवसीय सामने

भारतीय संघ 10, 12, 14 तारखेला टी-20 सामने खेळणार असून 17, 19, 21 ला एकदिवसीय सामने टीम इंडिया खेळेल.

2 कसोटी सामने

भारतीय संघ 26 ते 30 डिसेंबरदरम्यान पहिली कसोटी खेळणार आहे. दुसरा कसोटी सामना 3 ते 7 जानेवारीदरम्यान होणार आहे.

VIEW ALL

Read Next Story