IND vs ENG : रोहित शर्माने तोडलं 'या' खेळाडूंचं स्वप्न; पहिल्या टेस्टमधून दिला डच्चू

भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यातील पहिल्या टेस्ट सामन्याला सुरुवात झाली असून इंग्लिश खेळाडूंनी प्रथम फलंदाजी केलीये. यावेळी इंग्लंडच्या फलंदाजांना साजेशी कामगिरी करता आलेली नाही.

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू झालाय.

या सामन्यात स्पिन गोलंदाज मोठा फॅक्टर असून रोहित शर्माने पहिल्या टेस्टमधून 3 प्रमुख खेळाडूंना बाहेर ठेवलं आहे.

वेगवान गोलंदाज आवेश खान पहिल्या टेस्ट सामन्यातून बाहेर आहे कारण पहिल्या टेस्ट सामन्यात भारतीय संघ तीन स्पिनर्स खेळवण्याचा निर्णय घेतलाय.

इंग्लंडविरुद्धच्या या टेस्ट सिरीजमध्ये 22 वर्षीय युवा विकेटकीपर फलंदाज ध्रुव जुरेलचाही भारतीय टीममध्ये समावेश आहे, पण त्याला पहिल्या कसोटी सामन्यात त्याला संधी मिळाली नाही.

ध्रुव जुरेलच्या ऐवजी टीम इंडियात विकेटकीपर फलंदाज केएस भरत याला संधी दिली आहे .

टीम इंडियाचा 'चायनामॅन' गोलंदाज कुलदीप यादव पहिल्या कसोटी सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नसून त्याच्या जागी अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनसह स्पिनर गोलंदाजी रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे.

यावेळी वेगवान गोलंदाज म्हणून मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांची प्लेइंग इलेव्हनमध्ये निवड करण्यात आली आहे.

VIEW ALL

Read Next Story