साई सुदर्शन

साई सुदर्शन या नवख्या खेळाडूने सर्वांना आश्चर्यचकित केलंय. केन विलियम्सन जखमी झाल्याने एम्पॅक्ट प्लेयर म्हणून मैदानात आलेल्या साईने आक्रमक फटकेबाजी केली होती.

Apr 04,2023

अल्जारी जोसेफ

मोहम्मद शमीसह अल्जारी जोसेफ याच्या गोलंदाजीची धार आज पहायला मिळू शकते. बॉऊसरचा मारा आज दिल्लीला सहन करावा लागू शकतो.

यश दयाल

युवा गोलंदाज यश दयाल याने आपल्या गोलंदाजीमुळे सर्वांना सुखद धक्का दिला होता. त्यामुळे यश दयालच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष असेल.

जोशवा लिटल

जोशवा लिटलने मागील सामन्यात दमदार गोलंदाजी करत धावसंख्या रोखण्याचं काम केलं होतं. त्यामुळे त्याला आजही संधी दिली जाईल, अशी शक्यता आहे.

मोहम्मद शमी

गुजरातच्या फास्ट बॉलिंगचा आधारस्तंभ म्हणजे मोहम्मद शमी. शमीने मागील सामन्यात चेन्नईची सलामीजोडी फोडली होती. त्यामुळे आजही तो चांगली कामगिरी करेल, अशी अपेक्षा आहे.

राशिद खान

राहुल तेवतियासह राशिद खानने मागील सामन्यात विनिंग खेळी केली होती. फिरकीच्या पट्टीत सापडला की फलंदाजाचा विषयच संपला. आजच्या पिचवर राशिदची बॉलिंग महत्त्वाची असेल.

राहुल तेवतिया

जेव्हा जेव्हा संघाला गरज असते, तेव्हा तेव्हा मदतीला धावून येतो राहुल तेवतिया. गुजरातसाठी फिनिशरची भूमिका राबवणाऱ्या तेवतियाच्या कामगिरीवर लक्ष्य असेल.

विजय शंकर

विजय शंकरने चेन्नईविरुद्ध आक्रमक फलंदाजी करत गुजरातची धावसंख्येची गती वाढवली होती. त्यामुळे आजच्या खेळपट्टीवर त्याच्या फलंदाजीची परीक्षा असणार आहे.

ऋद्धीमान साहा

ऋद्धीमान साहा पहिल्या सामन्यात अपयशी ठरला होता. त्यामुळे त्याच्या आजच्या सामन्यामध्ये त्याच्यावर नजर असणार आहे.

शुबमन गिल

शुबमन गिलने सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. चेन्नईविरुद्ध शुभमनने जोरदार सुरूवात केली होती. त्यानंतर आता दिल्लीच्या गोलंदाजांची धुलाई करण्यासाठी तो सज्ज झालाय.

हार्दिक पांड्या

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरातने मागील आयपीएल कप जिंकला होता. त्यानंतर आता पुन्हा पांड्याने विजयी सूरूवात करून दिली.

VIEW ALL

Read Next Story