आयपीएल 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्सची कामगिरी फारशी समाधानकारक झालेली नाही. दिल्लीने 8 सामन्यात केवळ 3 सामने जिंकलेत.

प्ले ऑफसाठी दिल्लीला उर्वरीत सर्व सामने जिंकावे लागणार आहेत. पण त्याआधीच दिल्लीला कॅपिटल्सला मोठा धक्का बसला आहे.

ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर खेळाडू मिचेल मार्श आयपीएल 2024 च्या उर्वरीत हंगामातून बाहेर झाला आहे.

मार्शच्या डाव्या हाताला दुखापत झाली आहे. यावर उपचार करण्यासाठी मिचेल मार्श ऑस्ट्रेलियाला परतला आहे.

मिचेल मार्श पुन्हा दिल्ली संघात परतेल असा विश्वास दिल्लीचे मुख्य प्रशिक्षक रिकी पॉण्टिंग यांनी व्यक्त केला आहे.

ऑस्ट्रेलियात मिचेल मार्शवर काही दिवस डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार केले जातील. पण दुखापत मोठी असल्याने मार्शला जास्त दिवस लागण्याची शक्यता वर्तवली जातेय.

आयपीएल 2024 मध्ये मिचेल मार्शने दिल्ली कॅपिटल्सासाठी चार सामन्यात 15.25 च्या अॅव्हरेजने 61 धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या 23 आहे.

VIEW ALL

Read Next Story