आयपीएलच्या 58 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पंजाब किंग्सचा पराभव केला. या विजयाबरोबर बंगळुरुने प्ले ऑफमधलं आपलं स्थानही कायम ठेवलं

बंगळुरुच्या विजयाचा हिरो ठरला तो स्टार फलंदाज विराट कोहली. कोहलीने या सामन्यात 92 धावा केल्या. यात त्याने 6 षटकार आणि 7 चौकारांची बरसात केली.

विराट कोहलीच्या या खेळीने बंगळुरुने सलग चौथा विजय मिळलाय. पॉईंटटेबलमध्येही बंगळूरु सातव्या क्रमांकावर पोहोचली आहे.

या सामन्यात पंजाबच्या फलंदाजीदरम्यान रायलो रिसोने अर्धशतक केल्यानतंर एका पायाने गुडघ्यावर बसत जल्लोष व्यक्त केला होता.

रायलो रुसोने 27 चेंडूत 61 धावा केल्या. पण ज्यावेळी रुसो बाद झाला त्यावेळी विराट कोहलीची मैदानावरची प्रतिक्रिया बघण्यासारखी होती.

रुसो बाद झाल्यानंतर कोहलीने त्याची नक्कल करत गुडघ्यावर बसत बंदुकीतून गोळ्या मारण्याची अॅक्शन केली. त्याच्या गन सेलिब्रेशनची चांगलीच चर्चा रंगलीय.

विराट कोहली यंदाच्या आयपीएलमध्ये जबरदस्त फॉर्मात आहे. त्याने 12 सामन्यात 634 धावा केल्यात. पर्पल कॅपच्या शर्यतीत तो टॉपवर आहे.

VIEW ALL

Read Next Story